
आशाताई बच्छाव
नवरात्रोत्सवात भेटली नंदिनी!
आजचा सामाजिक विषयांवर असलेला लेख थोडा आपणास सोबतचे छायाचित्र बघून बुचकळ्यात टाकणारा व अचंबित करणारा ठरेल.मालेगाव शहरात सूरू असलेल्या नवरात्रोत्सवा निमित्ताने सहजच ठिकठिकाणी भेटी देत फिरत असताना “नंदिनी”भेटली.व तिच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, आणि मग साहजिकच “नंदिनी”च्या वाट्याला आलेले जगणं बघून क्षणभर दुःख पण वाटले.मात्र एका बाजूला “नंदिनी”चे कौतुकही वाटले.कुठल्याही दुःखाचे चेह-यावर साधे भाव न आणता “ठेविले अनंते तैसेचि रहावे,चिती असू द्यावे समाधान”या “नंदिनी”च्या वागण्यातील बिनधास्तपणा बघितल्यावर लक्षात आले.या भुतलावर निसर्गतः परमेश्वराने जसे स्री व पुरुष जन्माला घातलेत अगदी तसेच तृतीयपंथी सुध्दा जन्माला घातलेत.”नंदिनी”सुध्दा तृतीयपंथी जमातींमध्ये मोडणारी अगदी जास्त नाही पण..एकोणावीस वीस वय असलेली तृतीयपंथी! आज समाजात सभ्यतेचा बुरखा पांघरून स्वतः ला अगदी उच्च विद्या विभुषीत समजणारे पांढरपेशी देखील तृतीयपंथीयाची थट्टा व टिंगल करतांना बघितले की, अक्षरशः वाईट वाटते.कुठलाही दोष नसलेली निसर्गतः परमेश्वराने जन्माला घातलेली तृतीयपंथी हि जमात देखील तुमच्या आमच्या सारखीच चालती फिरती बोलकी माणसं आहेत.त्यांनाही मान सन्मानाची वागणूक खरे तर मिळायलाच हवी.तृतीयपंथी आता कुठेही मागे नाहीत काही तर पोलिस सेवेत सुध्दा आहेत.तर मध्य प्रदेशातील शबनम मौसी नावाचा तृतीयपंथी आमदार सुध्दा झाला होता.आणि त्यावर चित्रपट देखिल येऊन गेला.शासनाने अलिकडेच तृतीयपंथींना मतदानाचा हक्क दिला.आता त्याचप्रमाणे शासनाने तृतीयपंथींना शिक्षणाचा हक्क व त्यांनाही जगण्यासाठी मुलभूत अधिकार देऊन सन्मानाची वागणूक देणे खरे तर काळाची नितांत गरज आहे.कारण तृतीयपंथी सुध्दा आपल्या सारखीच माणसं आहेत,हे कदापि विसरता येणार नाही, एव्हढेच यानिमित्ताने!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक
युवा मराठा न्यूज महाराष्ट्र