Home बुलढाणा ट्रॅक्टरवर मळणी यंत्रात हातातील कडा अटकल्याने युवकाचा पंजाच कटला; बुलढाणा तालुक्यातील चांडोळ...

ट्रॅक्टरवर मळणी यंत्रात हातातील कडा अटकल्याने युवकाचा पंजाच कटला; बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील घटना.

58
0

आशाताई बच्छाव

1000811025.jpg

ट्रॅक्टरवर मळणी यंत्रात हातातील कडा अटकल्याने युवकाचा पंजाच कटला; बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील घटना.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील घटना ट्रॅक्टरवर मळणी यंत्रातून सोयाबीन काढतांना युवकाचा हातातील कडा यंत्राच्या दात्यात अटकल्याने उजव्या हाताचा पंजा मनगटापासुन कटुन वेगळा झाल्याची घटना बुधवारी ११ वा.दरम्यान गणेश बैरागी वय(३०)असे जख्मी झालेल्या युवकाचे नाव आहे.सकाळी ९ वा.दरम्यान गणेश बैरागी आपला मालकीचे ट्रॅक्टर घेऊन मजुरा सोबत चांडोळ येथील शेतकरी गणेश राऊत यांच्या शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेला होता.ट्रॅक्टरच्या यंत्रात सोयाबीन लोटण्याचे काम गणेश करत होता
सोयाबीनचा काड यंत्रात लोटता लोटता मशीनच्या दात्यात उजव्या हातातील कडा आटकला आणि गणेशचा मनगट आत ओढल्या जात असल्याचे मजुरांना दिसताच गणेशला बाहेर ओढले नाहीतर जख्मी गणेशला यंत्राने आत ओढल्या असते.यंत्रात हातातील कडा यंत्राच्या दात्यात अटकल्याने उजव्या हाताचा मनगटापासुन कटुन वेगळा झाला. टक्टर कामावरील मजुरांचे गणेश कडे लक्ष नसते त्याला जीव गमवावा लागला असता.यंत्रात जख्मी झालेल्या गणेशला छातीला व डोक्याला मार लागला आहे. बुलढाणा येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले नंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
चौकट आधुनिक काळातील शेती उपयोगी साधनांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ट्रॅक्टरवरील मळणी यंत्र,कुट्टी मशीन,चारा कटर,रोटाव्हेटर, पेरणी यंत्र हाताळतांना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मशनरी हताळतांना गळयात रुमाल,हातात कडा नसावा,हाताच्या दोन्ही बाहया वर असाव्या,नशा केलेला नसावा ही काळजी शेतकरी,शेतमजुर,शेतातील वाहन धारकाने घेणे गरजेचे आहे.

Previous articleपतीसोबत झालेल्या भांडणामुळे पत्नी घरातून बाहेर गेली आणि…
Next articleबुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here