आशाताई बच्छाव
राजकीय पुढार्यांचे लाड बंद करा, भ्रष्ट राजकारण्यांचा बी मोड करा-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 04/10/2024
राज्यातील सर्व धर्म समभाव याप्रमाणे सर्व जाती धर्माच्या मायबाप जनतेने एकत्र यावं आणि परंपरागत राजकारणात येऊन सत्ता उपभोगणाऱ्या सर्वच राजकीय पक्षं व राज्यकर्त्यांच राजकारण बंद करण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागिल 70 वर्षात असा जातीवाद व भ्रष्टाचार कधीच पाहयाला मिळाला नाही तो या 05 वर्षात मिळाला आहे.राज्यातील जनता असुरक्षित आहे.कायद्याची भीती शिल्लक राहिलेली नाही गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.सर्वच भ्रष्ट राजकीय पक्षांनी भ्रष्टाचार करून कमालीची माया मिळवली आहे. याचा विचार राज्यातील सर्वसामान्य मायबाप जनतेने करायला हवा. वैयक्तिक स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांनी तसेच विरोधकांनी मिळून काही फुकट्या योजना आणल्या आहेत, त्यामुळे जनतेच्याच पैशावर यांनी डल्ला मारला आहे. तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या पैशावर मौजमजा करायची आणि एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने घ्यायचे असाच गोरख धंदा सरकारने सुरू केलेला आहे .अलीकडेच आलेली लाडकी बहीण योजना या योजनेतील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देऊन दुसरीकडून जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहे .त्यामुळे शासनाची ही कृती म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणे अशीच असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केला आहे. आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्षाला मतदान न करता कुठल्याच प्रकारचा जातीवाद न ठेवता आपण सर्व अठरा पगड बहुजन समाज एक आहोत या भावनेने सर्वसामान्य कुटुंबातील कर्तव्यनिष्ठ व एकनिष्ठ व्यक्तींना उमेदवार म्हणून जाहीर करावं आणि त्यांना निवडून आणावं असे आवाहनही त्यांनी केले. यामागील प्रमुख कारण म्हणजे सत्ताधारी व विरोधी म्हणजेच एकूणच सर्वच राजकीय पुढार्यांनी जाती-जातीमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जातिवाद निर्माण करून सत्ता कशी मिळवायची याच्यासाठीच आटोकाट प्रयत्न सुरू केलेले आहेत.सत्ताधारीआणिविरोधि ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यांनी मिळून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख यांनी केले आहे.पुढे असेही सांगितले की,मग त्या ठिकाणी शेतकरी असो की शेतमजूर अथवा कर्मचारी वर्ग असो सर्वांना वेठीस धरण्याचं काम या हुकूमशाही नेत्यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शेतकरी व कर्मचारी यांच्यावर या राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे भीक मागण्याची वेळ आलेली आहे यासाठी राज्यातील जनतेने पेटून उठलं पाहिजे आणि या लोकांकडे भीक मागण्या ऐवजी मागणारे बनण्यापेक्षा देणारे बना असेही आवाहन यावेळी करण्यात आले. सर्वसामान्य जनतेवर कुठलाही एखादा कठीण प्रसंग आला असता अशा वेळी कोणता राजकीय पुढारी त्यांच्या मदतीला धावून आला असे एखादे उदाहरण पूर्ण देशातही शोधून सापडेल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला. सरकार अनुदान देत म्हणजे राज्यातील जनतेवर उपकार करत नाही हा जनतेचाच पैसा आहे आणि तोच पैसा भीक वाढल्यासारखं वाढत आहे परंतु हा मुद्दा केवळ वाचण्यापुरता आणि पाहण्यापुरताच राहिलेला नसून एकूणच राज्यात व देशात सुरू असलेली राजकीय पक्षांची हुकूमशाही यामुळे सर्वसामान्य जनता कोंडीत सापडलेली आहे.परंतु हि हुकूमशाही सत्ता उलथवून टाकण्याची एक चावी जनतेच्या हातात आहे.तीचा योग्य वापर करण्याची प्रामाणिक गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं.अनेक मंत्री आमदार खासदार राजकीय पुढारी प्रशासनातील अधिकारी भ्रष्टाचारांमध्ये रंगेहात पकडले असूनही त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. राज्यामध्ये देशांमध्ये अनेक मंत्री तसेच राजकीय पुढारी अनेक प्रकारच्या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले असतानाही ते उजळ माथ्याने मोकाट फिरत आहेत.त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही ही सर्वसामान्य जनतेची नागरिकांची फसवणूक आहे .ही फसवणूक कायमस्वरूपी थांबवायची असेल तर जात-पात सगळे विसरून राज्यातील सर्व मायबाप जनता जनार्दनाने एका छताखाली येऊन निष्पक्ष निर्भीड आणि निष्कलंक समाजातील उमेदवार देऊन त्याला निवडून आणावं आणि हा भ्रष्टाचार इथेच थांबवावा अन्यथा हे रोपट राहिले नसून याचा आता महाकाय वटवृक्ष झालेला आहे. तो वटवृक्ष सर्वसामान्य जनतेला खाऊन टाकेल आपल्यातीलच आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी तुमच्या आमच्यातीलच होते परंतु जनता डोळे लावून बसल्यामुळे यांनी मनमानी कारभार करून कमालीचे भ्रष्टाचार करून अवाढव्य माया जमविली आहे .सर्वसामान्य जनता मात्र आजही घराच्या आत पाय खोरुन मरत आहे याला जबाबदार आपणच आहोत हे मात्र विसरून चालणार नाही. यासाठी सर्वांनी एक ठिकाणी येऊन अशा भ्रष्ट लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हद्दपार करण्याची एक सुवर्णसंधी म्हणजे मतदान त्या मतदानातून फार मोठे परिवर्तन घडविण्याची ताकद मतदारांमध्ये असते याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे.