
आशाताई बच्छाव
गायत्री नगरात माता राणीचे उत्साहात आगमन व विधिवत पूजन व स्थापना.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 04/10/2024
याविषयी सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरात्री उत्सवानिमित्त गायत्री नगर जालना येथे माता राणीचे आगमन झाले. आगमन प्रसंगी उपस्थित गायत्री नगर वाशियांनी देवीच्या मूर्तीची पूजा केली व गायत्री नगरात मिरवणुक काढण्यात आली होती.यामुळे गायत्री नगर सह जालना शहरात भक्तीमय व आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
या मिरवणुकीत विनायक पाटील, आदित्य पारिख,प्रतिक खरात , सौरभ खरात, विशाल तौर, रुद्राक्ष चौधरी, उज्वल, रोहन, अभिषेक, शुभम खरगे, शिव सावंत, निलेश, जयेश कुंडलकर प्रेम तोडावत ,तन्मय, स्वराज, राहुल, पियुष, शंकर खरवडे, सागर धोंडे यांच्यासह अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते.