Home बुलढाणा बिबट पाठोपाठ आता कुत्र्यांचाही अटॅक ! अडीच वर्षीय चिमुकली गंभीर !

बिबट पाठोपाठ आता कुत्र्यांचाही अटॅक ! अडीच वर्षीय चिमुकली गंभीर !

85

आशाताई बच्छाव

1000787935.jpg

बिबट पाठोपाठ आता कुत्र्यांचाही अटॅक ! अडीच वर्षीय चिमुकली गंभीर !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा घरात खेळत असलेल्या एका अडीच वर्षीय चिमुकलीवर घरात घुसून एका कुत्र्याने हल्ला केला. यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ढालसावंगी या गावात घडली आहे. तत्पूर्वी मोताळा तालुक्यातील नळकुंड येथे बिबट्याने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. दरम्यान फॉरेस्ट विभाग आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या घटनेबद्दल अनभिज्ञ असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भातील उपाय योजनांची मागणी केली जात आहे.
अनाबिया अजहर खान वय अडीच वर्ष रा. धाड ता.जि. बुलढाणा ही आपल्या आई सोबत मामाच्या गावी ढालसावंगी येथे आलेली होती. आज गुरुवारी दुपारी ती घरात खेळत असताना एका कुत्र्याने आत प्रवेश करून चिमुकलीवर हल्ला चढविला. घरातील इतर मंडळी धावून आल्याने कुत्रा घराबाहेर पडून गेला मात्र या हल्ल्यात अनाबियाच्या तोंडावर चावा घेतल्याने तिला गंभीर दुखापत झालेली आहे. सध्या तिच्यावर बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या कुत्र्याने ढालसावंगी येथील इतर 4 ते 5 जनावर सुद्धा हल्ला करून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. सदर कुत्रा पिसाळलेला असल्याची शंका आल्याने नागरिकांनी त्याला ठार मारले.

Previous articleपॉलिटिक्स चिखलीत आरोप प्रत्यारोपाचे राजकारण! काँग्रेस भाजपावर भारी !
Next articleब्रेकिंग न्यूज भुकंप ! भाजपच्या डोक्यात काय? शिंदे, पवारांना वाऱ्यावर सोडून भाजप स्वतंत्र लढणार….. काय आहेत कारणे..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.