Home बुलढाणा पॉलिटिक्स चिखलीत आरोप प्रत्यारोपाचे राजकारण! काँग्रेस भाजपावर भारी !

पॉलिटिक्स चिखलीत आरोप प्रत्यारोपाचे राजकारण! काँग्रेस भाजपावर भारी !

19
0

आशाताई बच्छाव

1000787933.jpg

पॉलिटिक्स चिखलीत आरोप प्रत्यारोपाचे राजकारण! काँग्रेस भाजपावर भारी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे आणि भाजपाच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्यातील शीतयुद्ध सर्वांनाच माहित आहे. दरम्यान एकमेकांच्या समर्थकांकडून टोकाचे आरोप
प्रत्यारोप होत असतात. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आंदोलनाला भिडले होते. कर्ज बुडवल्याचा एक आरोप राहुल बोंद्रे यांच्या विरोधात आला आहे. परंतु जनता दुधखुळी थोडीच आहे ?
झाले काय तर वाचा .. चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे माजी आमदार राहुल बोंद्रे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहलेले निवेदन फाडले अन् ते अन्नत्याग आंदोलनाला बसले होते. तर राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँक बुडवण्यात मोठा हात असल्या प्रकरणी व शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून त्यावर आपल्या शैक्षणिक संस्था स्थापन केल्याप्रकरणी काही शेतकऱ्यांनी (?) ‘राहुल बोन्द्रे’ यांच्याविरोधातच
अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. ते भाजपाचे समर्थक होते हे लपून राहिलेले नाही. दरम्यान राहुल बोंद्रे यांनी भाजपाच्या विद्यमान आमदार श्वेता महाले यांच्या विरोधात तत्पूर्वीच पांदण रस्त्याचा कोट्यावधींचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता. दरम्यान त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. पलटवार म्हणून बुलढाणा मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना निषेध नोंदवण्यासाठी गेलेले बोंद्रे यांच्या हातातील शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन फाडण्यात आले. त्यामुळे बोंद्रे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर पंढरीनाथ टेकाळे यांनी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जाशी राहुल बोन्द्रे यांचे
संबंध नसून, राजकीय वैमनस्यातून राहुल बोंद्रेचा संबंध जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कर्जाशी जोडला जात असल्याचे आपल्या फेसबुक पोस्टमधून व्यक्त केले होते. परन्तु या संदर्भात जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांनी माहिती मागितली असता, राहुल बोंद्रे व कुटुंब यांच्याशी संलग्न संस्थाकडे कर्ज अद्यापही बाकी असल्याचे जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून प्रसारित पत्रामध्ये सांगण्यात आले. ही बातमी किती खरी आणि किती खोटी आहे हे चिखली विधानसभा मतदारसंघात प्रत्येक जण ओळखून आहे. त्यामुळे ‘राहुल बोंद्रे तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है’ चा आवाज चिखली मतदारसंघात दुमदुमत आहे

Previous articleखळबळ ! विवाहीत महिलेवर धारदार शस्त्राने वार .. महिला जागीच ठार ! संशयीत पतीला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Next articleबिबट पाठोपाठ आता कुत्र्यांचाही अटॅक ! अडीच वर्षीय चिमुकली गंभीर !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here