
आशाताई बच्छाव
शेतात वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू; तीन गंभीर जखमी
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-शेलू शेतात काम करतांना अंगावर वीज पडल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नजिकच्या जुवाडी येथे घडली. सदर दुर्घटनेत तीन शेतमजूर महिला गंभीर तर दोघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. मंदा प्रभाकर वाघमारे (वय ५५) रा. जुवाडी असे मृतक महिला शेतकऱ्याचे नाव आहे. यातील जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती यावेळी स्थानिकांनी दिली.
जुवाडी येथील शेतकरी प्रभाकर वाघमारे आपल्या
सौभाग्यवतीसह पाच महिला शेतमजूर घेऊन गुरुवारी
सकाळी शेतातील कामानिमित्त गेले होते. दरम्यान
दुपारी ४ वाजताच्या सुमारास जुवाडी परिसरातील शेतशिवारात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी सगळेच शेती कामात व्यस्त असतांना अचानक शेतात वीज कोसळली. यात मंदा प्रभाकर वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर अर्चना तुकाराम दाभेकर (वय ३६), किरण लती वाल्हे (वय ३०) आणि उर्मिला दिलीप कोल्हे (वय ३२) तीनही रा.जुवाडी यांना वीजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्यात. दरम्यान दोन महिला मजूरांना देखील यावेळी किरकोळ इजा झाल्याचे सांगितले जाते. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.