
आशाताई बच्छाव
दोन व्यक्ती गेले वाहून ! -मृतदेह सापडला नाही! -नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करते तरी काय ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेडच्या पुढे नाल्यामध्ये 2 व्यक्ती वाहून गेल्याचे आज 27 सप्टेंबरला घटना घडली आहे. या दोन्ही व्यक्ती परवा पासून म्हणजे दिनांक 25 सप्टेंबर रोजी पासून बेपत्ता होते. शोध घेताना त्यांची मोटरसायकल उंबरखेड येथील ओढ्याजवळ मिळून आली आहे. अजून सदरील दोन्ही व्यक्ती सापडलेले नाहीत. प्रितरंगल्यावरच नैसर्गिक आपत्ती विभाग शोध मोहीम
प्रितरंगल्यावरच नैसर्गिक आपत्ती विभाग शोध मोहीम राबवतो. कारण प्रेत फुगल्यावर वर येते आणि यांचं काम साध्य होते.
सागर घटनेतील दोन्ही व्यक्ती पिंपळगाव चिलमखा येथील, दीपक प्रल्हाद निकाळजे वय 29, अथर्व दीपक निकाळजे वय 5 वर्ष दोघे जवळ खेड येथील ओढ्यातून वाहून गेले असे प्राथमिक माहितीवरून समजले आहे. शोध मोहीम साठी बचाव पथकासोबत संपर्क करण्यात आलेला आहे. पोलीस व महसूल पथक तेथे थांबून शोध घेण्याचा नेहमीप्रमाणे प्रयत्न करत आहेत.
उद्या पुन्हा सकाळी शोध मोहीम सुरु होणार आहे.