Home भंडारा भंडारा युनिटची पुन्हा धमाकेदार कारवाई 2024 या वर्षातील आठवी सापळा कारवाई यशस्वी

भंडारा युनिटची पुन्हा धमाकेदार कारवाई 2024 या वर्षातील आठवी सापळा कारवाई यशस्वी

197
0

आशाताई बच्छाव

1000787917.jpg

भंडारा युनिटची पुन्हा धमाकेदार कारवाई 2024 या वर्षातील आठवी सापळा कारवाई यशस्वी

 

संजीव भांबोरे
भंडारा जिल्हा प्रतिनिधी तक्रार करते सेवानिवृत्त पुरुष वय 65 वर्षे राहणार तालुका साकोली जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून आरोपी लोकसेवक प्रवीण फुलचंद गिरेपुंजे वय 33 वर्षे पद -छाननी लिपिक वर्ग 3 भूमी अभिलेख कार्यालय साकोली जिल्हा भंडारा व राहुल गुलाबराव ब्रह्मपुरीकर वय 43 वर्षे पद मुख्यालय सहाय्यक वर्ग तीन भूमि अभिलेख कार्यालय साकोली जिल्हा भंडारा येथील कार्यालयात कार्यालयात असून तक्रारकर्त्याकडून 20,000 रुपयाची मागणी केली होती. परंतु
15,000 हजार रुपये देण्याच्या करार करण्यात आला .याबाबतची पडताळणी 26 सप्टेंबर 2024 ला करण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्ते यांच्याकडून लाच स्वीकारताना भंडारा युनिट कडून 27 सप्टेंबर 2024 ला 15000 रुपये हस्तगत करून रंगेहात पकडण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रार करता यांची मौजा जांभळी तालुका साकोली जिल्हा भंडारा येथे भूमापन क्रमांक 377 मध्ये 0. ७१ हेक्टर शेती असून सदर शेती निवासी प्रयोजनाकरिता टीपी करिता त्यांनी दिनांक 29 मार्च 2023 रोजी नगर रचनाकार भंडारा यांच्याकडे अर्ज केला होता. नगररचना कार्यालय भंडारा यांनी तक्रारदार यांचे अर्जावर कारवाई करून पुढील कारवाई करिता तहसीलदार कार्यालय साकोली आणि उपधीक्षक भूमी अभिलेख साकोली यांना पाठवली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी भूमि अभिलेख कार्यालय साकोली येथे नकाशाच्या मोजणी करता अर्ज केला. त्या अनुषंगाने तक्रारदार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी भूमी अभिलेख कार्यालय साकोली येथे गेले व आलोसे, गिरीपुंजे यांना भेटून नगर रचनाकार भंडारा यांनी केलेल्या शिफारस प्रमाणे प्लॉटची मोजणी करण्यात बाबत विचारणा केली असता त्यांनी नगर रचनाकार यांचे पत्र जुने आहे ते चालणार नाही असे सांगितले. व नवीन पत्र आणावे लागेल असे तक्रारदार यांना बोलले. तक्रारदार यांनी त्यांना मोजणी करून देण्याची पुन्हा विनंती केली असता आलोसे क्रमांक 1 व 2 यांनी एकमेकांशी चर्चा केली .आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांना तक्रारदार यांच्याकडे 20000 रुपये मागण्या सांगितले. त्यावरून आलोसे क्रमांक 1 यांनी जुन्या पत्रावरून मोजणी करायची असेल तर दोघांसाठी 20,000 हजार रुपयाची मागणी केली .त्यानुसार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी तक्रारदार यांनी त्या अनुषंगाने तक्रार नोंद केली. दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी सदर तक्रारीवरून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान दोन्ही आलोसे यांनी तडजोड अंती 15,0000हजार रुपये लाचेची मागणी केली .आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक क्रमांक 1 यांनी स्वतः करता व आलोसे क्रमांक 2 पंचायत सक्षम तक्रारदार यांच्याकडून 15000 रुपये लाज रक्कम स्वीकारले . सदर प्रकरणी पोलीस स्टेशन साकोली येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरील प्रकरणात मार्गदर्शन म्हणून दिगंबर प्रधान सर पोलीस अधीक्षक ला प्र. वि. नागपूर परिक्षेत्र नागपूर, सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि.नागपूर, संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि नागपूर , सापळा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक डॉ. अरुण कुमार लोहार ला. प्र.वी. भंडारा, सापळा व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अमित डहारे , ला प्र .वी .भंडारा, सापळा पथक पोलीस उपअधीक्षक डॉ.अरुण कुमार लोहार ,पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजरकर ,पोलीस हवालदार मिथुन चांदेवार , पोलीस हवालदार अतुल मेश्राम, पोना अंकुश गाढवे ,पोलीस शिपाई राजकुमार लेंडे, पो ना नरेंद्र लाखडे , पोलीस शिपाई विष्णू वरठी,पोलीस हवालदार सीलपेंद्रे मेश्राम ,पोलीस शिपाई चेतन पोटे ,पोलीस शिपाई मयूर सिंगनजुडे, पोलीस शिपाई पोलीस चालक राहुल राऊत ,महाराष्ट्र पोलीस शिपाई अभिलाषा गजभिये, सर्व लाच लचपत प्रतिबंधक विभाग भंडाराचे कर्मचारी व अधिकारी यांनी या कामात मोलाचे सहकार्य केले

Previous articleअपंग व्यक्तीला पॅन्ट आणि शर्ट चे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा
Next articleरविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मूर्तिजापूरात शेतकरी आक्रोश मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here