Home भंडारा अपंग व्यक्तीला पॅन्ट आणि शर्ट चे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला...

अपंग व्यक्तीला पॅन्ट आणि शर्ट चे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा

87

आशाताई बच्छाव

1000787912.jpg

अपंग व्यक्तीला पॅन्ट आणि शर्ट चे वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस केला साजरा

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)मनात सामाजिक बांधिलकी जपण्याची इच्छा असेल तर जीवनात पैसा असणेच गरजेचे नाही. हवी मदतीची मानसिकता या गोष्टीचा प्रत्यय पवनी तालुक्यातील मांगली चौरास येथील स्वतः एका गरीब कुटुंबातील विद्यार्थी असून मात्र आपल्या वाढदिवसाला दिव्यांगांना मदत करून वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा पायंडा चेतन पडोळे याने घातला.

चेतन स्वतः शिक्षण पूर्ण करून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. तसेच मंगली ग्रामपंचायत चे सदस्य गावचे आजच्या आधुनिक काळात युवा तरुण पिढी केक, पार्टी, जल्लोष आणि मद्यधुंदीच्या आहारी जात
असल्याचे चित्र बघायला मिळते. परंतु, युवा पिढीचे वैचारिक क्रांती एका विरुध्द प्रवाहात दिसून येते. सामाजिक अस्मितेची जाणीव करत चेतन पडोळे यांनी कोणत्याही प्रकारच्या जल्लोष न करता अपंग, दिव्यांग विद्यार्थ्यांना शर्ट’ आणि पॅन्ट चे वाटप करून केला वाढदिवस साजरा. गरजू व्यक्तींना अंगावर घालायला नवीन कपडे मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर असणारे हसू हेच चेतनच्या वाढदिवस साजरी करणाच्या आनंदापेक्षा कितीतरी महत्वाचे आहे. हे त्याच्या कृतीतून दाखवून दिले. यावेळी त्याच्यासोबत सामाजिक जाणीवेने प्रेरीत.
चेतन पडोळे ग्रामपंचायत सदस्य , चंद्रशेखर पडोळे निर्वण पडोळे सोनू पडोळे मनिष गभणे, गणेश खांदाडे विकी रामटेके टिकाराम वैद्य स्वप्निल पडोळे गुरु काटेखाये इत्यादी मित्रपरीवार उपस्थित होते.

Previous articleइटगाव पुनर्वसन( पागोरा )भंडारा पवनी मुख्य मार्गावर खड्ड्यांच्या भरतो बाजार
Next articleभंडारा युनिटची पुन्हा धमाकेदार कारवाई 2024 या वर्षातील आठवी सापळा कारवाई यशस्वी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.