Home जालना जाफराबाद पोलिसांनी केला खुलताबाद येथील खुनाचा उलगडा एक आरोपी अटकेत.

जाफराबाद पोलिसांनी केला खुलताबाद येथील खुनाचा उलगडा एक आरोपी अटकेत.

103
0

आशाताई बच्छाव

1000787070.jpg

जाफराबाद पोलिसांनी केला खुलताबाद येथील खुनाचा उलगडा एक आरोपी अटकेत.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 27/09/2024..
सविस्तर वृत्त असे की,दिनांक 19 /09 /2024 रोजी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे जाफराबाद यांना गोपनीय माहिती मिळाली की जाफराबाद ते भोकरदन जाणारे रोडवर आरदखेडा फाटा या ठिकाणी काही संशयित चोरटे गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेले आहे. अशा प्रकारची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर तात्काळ वरिष्ठांना माहिती देऊन घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पठाडे ,पोलीस उपनिरीक्षक नेमाने ,पोलीस जाधव व सोबत पोलीस स्टॉप असे गेले व त्या ठिकाणी एक आरोपी नामे आतिश आशोक पवार वय 25 वर्ष राहणार नवापूरवाडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात असलेल्या बॅगमध्ये पाहणी केली असता घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आल्याने ताब्यात घेतले. त्या ताब्यात घेतलेल्या साहित्याची पडताळणी केली असता सदरचे साहित्य हे पोलीस स्टेशन जाफराबाद हद्दीतील कुंभारी येथे घडलेल्या घरफोडीच्या संदर्भाने असल्याने सदर आरोपीला कुंभारी येथील घरफोडीच्या अनुषंगाने दाखल झालेला गुरनं 266/2024 कलम 305,331/ (6 )3 (5)BNS मध्ये अटक करण्यात आली आहे.
सदरचा आरोपी हा जाफराबाद पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यास विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळून खुलताबाद पोलीस स्टेशन हद्दीतील गल्लेबोरगाव येथील शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख राजीव आसाराम हारदे व त्यांची पत्नी सुनीता राजीव हारदे यांच्या घराचा दिनांक 17/ 09 /2024 रोजी रात्री कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून राजीव आसाराम हारदे यांच्या पोटात व डोक्यात चाकूने वार करून गंभीर जखमी केले उपचारादरम्यान राजीव आसाराम हारदे हे मरण पावले आहे. तसेच त्यांची पत्नी ला मारहाण करून गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेली आहे. याबाबत पोलिस स्टेशन खुलताबाद येथे गुरनं 0380/2024 कलम 310(3) व इतर BNS प्रमाणे दिनांक 17/ 09/2024 रोजी गुन्हा नोंद आहे.
वरील बाबत खुलताबाद पोलीस स्टेशनला सविस्तर माहिती कळविण्यात आली आहे .या माहिती वरून खुलताबाद पोलिसांनी वर नमूद आरोपी बाबत माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी खुलताबाद यांचे प्रोडक्शन वार्ड घेऊन माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जाफराबाद यांच्या न्यायालयात दिनांक 21/09/ 2024 रोजी हजर होऊन माननीय न्यायालयाचा आदेश घेऊन सदर आरोपीचा ताबा घेतला आहे.
सदरचे कार्यवाही जिल्हा पोलिसअधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपाणी सर, उपअधिकारी पोलीस अधिकारी श्री गणपत दराडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रताप इंगळे पोलीस उपनिरीक्षक पठाडे ,पोलीस उपनिरीक्षक नेमाने ,पोलीस उपनिरीक्षक पवार ,पोलीस कॉन्स्टेबल भुतेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल डोईफोडे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल वैद्य, पोलीस हेड कॉन्स्टेबल गावंडे , पोना पठाडे, पोना टेकाळे, पो.कॉ. जाधव, पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के, पोलीस हेड कॉन्स्टेबल डोईफोडे, पोकॉ डुरे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी केली असून पुढील तपास जाफराबाद पोलीस करत आहे.

Previous articleआ.डॉ देवरावजी होळी हेच भाजपा महायुतीचे विजयी उमेदवार
Next articleइटगाव पुनर्वसन( पागोरा )भंडारा पवनी मुख्य मार्गावर खड्ड्यांच्या भरतो बाजार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here