Home विदर्भ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम अंभोरे पाटील

शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम अंभोरे पाटील

171
0

आशाताई बच्छाव

1000787016.jpg

शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत येणाऱ्या सातेफळ येथील शालेय समिती निवड प्रक्रिया आज केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी संपन्न झाली.
ग्रामीण भागातील शालेय शिक्षण समितीच्या दर दोन वर्षांनी निवड प्रक्रिया पूर्ण होत त्या अनुषंगाने आज केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी शालेय विद्यार्थी यांचे ग्रामीण भागातील जीवनमान व ग्रामीण भागातील शाळा त्या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व गुरुजन या सर्वांशी एकजूट असावी व त्यातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पहिली वर्ग पासून त्या विद्यार्थ्यांना त्याच्या जीवनाचे योग्य असे वळण लावण्याचे काम त्या शाळेत शिकवणाऱ्या गुरुजनावर अवलंबून असते व त्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे एकंदरीत राहणीमानापासून ते त्याच्या पूर्ण दैनंदिन वेळेतील अभ्यास कपडे या सर्व बाबीकडे शिक्षकाचे लक्ष अधिक असते विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांपेक्षाही संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शाळेतील शिक्षकाची महत्त्वाची जबाबदारी असते तर त्या शाळेतील एक मुख्य नेतृत्व म्हणून शाळा समितीची अत्यंत महत्त्वाची गरज असते तीच गरज आज संपूर्ण पालक वर्गातून शाळेच्या देखरेखीसाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकातून निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते
यामध्ये एकंदरीत एकूण सदस्य अधिक ग्रामपंचायत सदस्य शालेय शिक्षण प्रेमी सदस्य व शिक्षक यामधून प्रत्येक ग्रामीण भागातील शाळा समिती गठित केली जाते त्याच पद्धतीने केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी एकूण पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून एकंदरीत आठ सदस्य निवड प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यातूनच अध्यक्ष व उपाध्यक्ष याची निवड केल्या जाते त्या अनुषंगाने आज केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी शाळेतील सर्व शिक्षक मुख्याध्यापिका गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन गावातील प्रतिष्ठित नागरिक व त्याचबरोबर शालेय विद्यार्थी यांचे सर्व पालक शाळा शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्य यांच्या निवड प्रक्रियेत सहभागी झाले होते
विद्यार्थ्यांच्या पालकत्वातून अध्यक्ष मोतीराम बळीराम अंभोरे पाटील तर उपाध्यक्ष म्हणून कैलास पांडुरंग अंभोरे पाटील यांची निवड प्रक्रिया केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी पूर्ण झाली त्यावेळेस निवड प्रक्रियेमध्ये शाळेतील मुख्याध्यापिका फुलारी मॅडम व शिक्षक श्री चौरे सर यांनी मेहनत घेऊन शांतचित्तेने निवड प्रक्रिया पूर्ण केली निवडीनंतर नवनिर्वाचित शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मोतीराम अंभोरे पाटील व कैलास अंभोरे पाटील या अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ यांच्यावतीने सत्कार करण्यात आला त्यावेळेस माजी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची पण उपस्थिती अ क्षयसून नवनिर्वाचित अध्यक्षांचा माजी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या वतीने सत्कार समारंभ केंद्रीय प्राथमिक शाळा सातेफळ या ठिकाणी संपन्न झाला.
हिंगोली .श्रीहरी अंभोरे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here