Home विदर्भ शेतकऱ्यांनी पेरणीनंतर व काढणीनंतरही सोयाबीनला आलेले मोड पासुन डोळ्यात अश्रू आले.

शेतकऱ्यांनी पेरणीनंतर व काढणीनंतरही सोयाबीनला आलेले मोड पासुन डोळ्यात अश्रू आले.

43
0

आशाताई बच्छाव

1000787005.jpg

शेतकऱ्यांनी पेरणीनंतर व काढणीनंतरही सोयाबीनला आलेले मोड पासुन डोळ्यात अश्रू आले.
हिंगोली जिल्ह्यातील सततच्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याला काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसाने व सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीला झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे पिकाचे मोठे नुकसान या अगोदरच झाले आहे त्यानंतर अद्याप काही भागात नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे पुरते झालेले नाहीत तर पंचनामे होऊन एक महिना उलटायला आला तरी शेतकऱ्याला पीक नुकसानीच्या संदर्भात शासनाने जाहीर केलेल्या नुकसानीचे आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही राहिलेल्या पिकाची कहाणीला सुरुवात होतात परत परतीच्या पावसाने पार कंबरडेच मोडले गेल्या सहा दिवसापासून जिल्हाभरात प्रत्येक दिवशी पावसाने थैमान घातले आहे या परतीच्या पावसाने काढून टाकलेले सोयाबीनला पेरणीनंतर आलेले मोड व काढणीनंतर आलेले मोड सारखे दिसू लागल्याने शेतात जायला सुद्धा शेतकऱ्याची हिंमत होत नसल्याची आज घडीला पाहायला मिळत आहे शेतातील मोड पाहून सोयाबीनचे त्याच पद्धतीचे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा टपटपलेले पाहायला मिळत आहेत पेरणीसाठी काढलेली कर्ज त्यानंतर औषधी व खत यासाठी लागलेला खर्च निमणी खुरपणी कुळवणी अशा पिकाच्या वेळोवेळीच्या अंतर मशागत साठी मोठा खर्च झालेला आहे पण निसर्गाच्या समोर सर्वांनाच झुकावे लागते तशीच कथा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समोर पाहायला मिळत आहे पित्त गेले पण पिक विमा नाही व नुकसान भरपाई नाही उदास सरकारला शेतकऱ्याची दया येईल का असा टाऊ फोडून शेतकऱ्याचा आक्रोश हिंगोली जिल्ह्यातील पाहायला मिळत आहे .
हिंगोली.श्रीहरी आंबोरे पाटील .

Previous articleधक्कादायक ! इन्स्टाग्रामवरची ओळख पडली महागात; महाविद्यालयीन युवतीवर गोड बोलून चौघांकडून बलात्कार; आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन
Next articleशालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मोतीराम अंभोरे पाटील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here