आशाताई बच्छाव
सत्संगातून देश, धर्माला बळकटी
भास्करगिरी महाराज; सोनईत रामायण कथेचे ध्वजारोहण
सोनई, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी – रामायण कथा म्हणजे फक्त धार्मिक कार्य नसून कथा श्रवणातून नात्याचे बंधन अधिक दृढ होतात तसेच मनातील अनेक संभ्रम दूर होवून सद्मार्गाचे दर्शन घडते. धर्म नियमांचे पालन केले तर निश्चितच धर्म आणि देशाला बळकटी प्राप्त होते, असे विचार देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केले. सोनई येथे आमदार शंकरराव गडाख पांच्या संकल्पनेतून तसेच जगदंबादेवी ट्रस्ट, ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठान व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानमार्फत रामायणचार्य रामराव महाराज ढोक पांच्या सुवाश्र वाणीतून आयोजित तुलसी रामायण कथा सोहळ्याचे उदघाटन धर्म ध्वजारोहण व दीपप्रज्वलन
सोनई येथे तुलसी रामायण कथा सोहळ्याचे उद्घाटन धर्म ध्वजारोहणाने करताना देवगड संस्थानचे प्रमुख महंत भास्करगिरी महाराज.
करन झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात भास्करगिरी महाराज बोलत होते. संत ज्ञानेश्वर संस्थानचे संतसेवक देविदास महाराज म्हस्के, कारभारी महाराज
झरेकर, पंढरीनाथ महाराज तांदळे, कारभारी महाराज पंडित, विठ्ठल महाराज खाडे, साध्वी तुलसीदेवी, बाळकृष्ण महाराज सुडके व संत, महंत उपस्थित
होते. संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्ता विश्वासराव गडाख, माजी सभापती सुनील गडाख यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
म्हस्के महाराज यांनी नेवारेसे तालुक्यातील सर्व वारकरी साधकांना भास्करगिरी महाराज आईची माया देत असल्याचे सांगून धर्मध्वजावदत् माहिती दिली. प्रास्ताविक भाषणात मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडास यांनी रामायण सोहळा आयोजनाची माहिती दिली. ध्वजारोहणाचे पौरोहित्य अशोक कुलकर्णी व डिगंबर जोशी यांनी केले. प्राचार्य डॉ. गोरक्षनाथा कल्हापुरे यांनी सूत्रसंचालन केले. मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवरू यांनी आभार मानले.