Home जालना महात्मा फुले विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

महात्मा फुले विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

31
0

आशाताई बच्छाव

1000760950.jpg

महात्मा फुले विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 18/09/2024
घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील महात्मा फुले विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अमोल भैय्या तिडके यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव श्री. आत्मारामजी तिडके हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ए. ए. तिडके, पर्यवेक्षक श्री. एस. एस. गोसावी हे होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी थोर नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. अध्यापक श्री. एन. आर. माटे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. आर. ए. आंधळे यांनी केले. कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार श्री. आर. वाय. चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here