
आशाताई बच्छाव
महात्मा गांधी आणि फडणवीस हे एकाच माळेचे मनी – डॉ. राजरत्न आंबेडकर जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)
पुर्वी महात्मा गांधी यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाला विरोध केला होता, आणि आता फडणवीस हे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करीत आहेत. त्यामुळे महात्मा गांधी आणि फडणवीस हे एकाच माळेचे मनी आहेत. असा टोला रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी लगावला.
बदनापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसमोर चाणक्य मंगल कार्यालयात आज रविवार दि. 8 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता भारतीय बौध्द महासभेच्या वतीने विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी पक्षाचा चांगलाच समाचार घेतला. सत्ताधार्यांनी जाती-जातीत वाद निर्माण केले असून फोडून राज्य करीत असल्याचं त्यांनी म्हटलं. महाराष्ट्रात पुर्वी मराठा आणि तत्कालीन महार आताचा बौद्ध याच जातीचे लोक होते, त्याचे उदाहरण मराठा आणि तत्कालीन महार आत्ताचा बौद्ध यांच्या जातीवरुनच महाराष्ट्र निर्माण झाला असेही त्यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत अनेक दानवांना विधानसभेत पाठवले, परंतु, आता मानवांना विधानसभेत पाठवा असे आवाहन करुन त्यांनी आमदाराची चांगली फिरकी घेतली. दरम्यान महाराष्ट्रात जर मराठ्यांची सत्ता स्थापन करायची असेल तर 5 म एकत्र आले पाहिजेत, त्याच पहिला म म्हणजे मुख्यमंत्री, दुसर्या म म्हणजे मनोज जरांगे यासह अन्य म चा अर्थ सांगून विधानसभेत पाठविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना 54 देण्याची तयारी दाखविली. दरम्यान छगन भुजबळ यांचे नाव घेत त्यांना डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी चॅलेंज केलं.