Home बीड परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍याकडून फाटक बसवण्यास टाळाटाळ; नागरिक व भक्तांची होतेय गैरसोय –...

परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍याकडून फाटक बसवण्यास टाळाटाळ; नागरिक व भक्तांची होतेय गैरसोय – अँड.मनोज संकाये

54
0

आशाताई बच्छाव

1000691158.jpg

परळी नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍याकडून फाटक बसवण्यास टाळाटाळ; नागरिक व भक्तांची होतेय गैरसोय – अँड.मनोज संकाये

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: २८  परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दक्षिणमुखी गणेश मंदिरासमोर आणि वैद्यनाथ मंदिराजवळ लोखंडी कायमस्वरूपी फाटक बसवावे याकरिता मुख्याधिकाऱ्यांना मित्र मंडळाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन दिले परंतु आश्वासन देऊनही त्याची पूर्तता मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्याकडून अद्याप झाली नाही. त्यामुळे या रोडवर होणारी जड वाहनांची ट्रॅफिक मुळे भक्त आणि नागरिक परेशान होत आहेत त्यांची गैरसोय होत आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी त्वरित कायमस्वरूपी लोखंडी फाटक कोणतेही कारणे न देता बसवावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांनी मुख्याधिकारी यांना केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन असंख्य मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नगरपालिकेमध्ये देण्यात आले होते या संदर्भात अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या परंतु दोन दिवसांमध्ये प्रश्न सोडवू असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले त्यात राज्य कृषी महोत्सव परळीत असल्याने त्यामध्ये अधिकारी गुंतले असता आता मात्र कृषी प्रदर्शन संपताच त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चर्चा केली असता दोन दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लावू असे नुसते आश्वासन दिले परंतु पंधरा दिवस उलटून गेल्यानंतरही त्याची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घेतली नाही. अवजड वाहनांची ट्रॅफिक या रोडवर जास्त प्रमाणावर होते त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो नागरिकांनाही याचा फटका बसतो आहे. या सर्व बाबीचा विचार करून मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित कायमस्वरूपी लोखंडी फाटक बसवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

Previous articleउद्यापासून जिल्हा परिषद कर्मचारी जाणार बेमुदत संपावर.
Next articleजनआक्रोश संघटनेच्या पाठीशी नेहमी उभा राहणार ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here