
आशाताई बच्छाव
खडकपूर्णा प्रकल्पातून बोटी द्वारे होणारा अवैध रेती उपसा तात्काळ बंद करा बोटी नष्ट करा… शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– चिखली तालुक्यातील मौजे इसरुळ येथील बोटी नष्ट करायच्या नसतील रेती उपसा चालू ठेवायचा असेल तर अधिकृत करा जेणेकरून लोकांना स्वस्तात शासकीय दरात रेती मिळेल व शासनाची गौण खनिज चोरी सुद्धा थांबेल शिवाय विना नंबरचे यम दुताच्या रूपात धावणारे टिप्पर थांबतील अपघात टळतील लोकांचे जीव वाचतील…. ह्या सर्व रास्त मागण्या घेऊन आमचा लढा सुरू असताना सुद्धा आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्याचे काय या मागणीसाठी इसरुळ येतील माजी सरपंच संतोष भुतेकर व मंडप गावचे सरपंच सचिन कदम यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे 11 ऑगस्ट2024 रोजी निवेदन दिले असताना अजून सुद्धा शासनाचे कुठलेच पत्र त्यांना समजुती साठी किंवा प्रशासनाची भूमिका काय हे सांगण्यासाठी आले नाही आज मंडळ अधिकारी यांनी उपोषण तळी भेट देऊन निरोप पोहोचवला की आमच्या कारवाया सुरू आहेत आम्ही पथक नेमलेले आहेत परंतु खरंच पथकाच्या कार्यवाया मनापासून सुरू आहे का आणि पथक जर नियमित गस्तीवर आहे तर मग गाड्या चालतात कशा याचा अर्थ पथक पैसे घेऊन गाड्या सोडते असा नाही का होत पथक नेमून अवैध रेतीवर आळा घालण्यापेक्षा खडकपूर्णा प्रकल्पासाठी स्वतंत्र कार्यालय आहे मुख्य कार्यकारी अभियंता म्हणून क्लासवन अधिकारी त्या ठिकाणी आहे जे शेतकरी धरणामध्ये अतिरिक्त मोटर पंप सुद्धा शेतकऱ्यांना चालू देत नाही लोकांना एक मच्छी सुद्धा पकडू देत नाही अनेकदा लोकांचे वायर कापून नेले स्टार्टर काढून नेले मोटर पाण्यात लोटून दिल्या इसरूळ मध्ये मच्छी चोरतात म्हणून गुन्हे दाखल केले मंग 20 20 बोटी जर धरणात अवैध रेती उपसा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करत का नाही असा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला