
आशाताई बच्छाव
आज वसमत येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची जनसमान यात्रा व शेतकरी मेळावा महिला युवक संवाद याची जाहीर सभा . हिंगोली,( श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे आज 28 ऑगस्ट बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता शुभेच्छा आयोजन करण्यात आले आहे जनसमानयात्रा बुधवर रोजी वसमत येथे येणार आहे त्यानिमित्ताने वसमत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील नागरीक तरुन मतदार उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात शेतकरी व महिला मंडळ युवक उपस्थित राहणार आहे .यानिमित्ताने आज वसमत येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी गेल्या चार दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते मोठी मेहनत घेत असून हा कार्यक्रम साखर कारखाना रोडवरील मयूर मंगल कार्यालय समोरील जागेवर होणार आहे. आज बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता जन सन्मान यात्रा येणार आहे या सभेसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आव्हान वसमत विधानसभेचे आमदार राजू भैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे यांनी केले आहे.