Home ठाणे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा; आणखी सहा जणांचाही समावेश

माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा; आणखी सहा जणांचाही समावेश

69
0

आशाताई बच्छाव

1000687619.jpg

माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा; आणखी सहा जणांचाही समावेश

व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला.

युवा मराठा न्यूज ठाणे ब्यूरो चीफ :- फय्याज मोमीन

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक (डीजी) संजय पांडे आणि अन्य सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्य या आरोपांवरून ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला. मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला.

पुनामिया यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असल्याचे ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दुजोरा दिला.पुनामिया यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधीत यातील कथित आरोपींकडून आपण त्रास सहन केला. या तक्रारीमध्ये पांडे, निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील, पोलिस निरीक्षक मनोहर पाटील, तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांचा समावेश आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, आरोपींनी ठाणे नगर पोलिसांकडे २०१६ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बेकायदेशीर तपास केला. तक्रारदार आणि इतर व्यावसायिकांना खोट्या केस दाखल करण्याच्या धमक्या दिल्या,
पैसे उकळले आणि विशेष सरकारी वकील म्हणून खोटे दस्तवेज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

या कलमांन्वये झाला गुन्हा दाखल

१६६(अ) आणि १७० (शासकीय कर्मचाऱ्यांची गैरवर्तणूक आणि खोटे रूप धारण), १२० बी (फौजदारी कट), १९३ (खोट्या पुराव्यांची निर्मिती), १९५, १९९, २०३, २०५, आणि २०९ (खोटे विधान आणि न्यायालयाच्या कार्यात अडथळा), ३५२ आणि ३५५ (हल्ला), ३८४ आणि ३८९ (जबरदस्ती), ४६५, ४६६, आणि ४७१ (खोट्या दस्तऐवजांची निर्मिती आणि वापर) आदी कलमांचा समावेश आहे. ही तक्रार ठाणे नगर पोलिस ठाण्यात सोमवार, २६ ऑगस्ट २०२४ रोजी ई-मेलद्वारे पुनामिया यांनी दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here