आशाताई बच्छाव
आरसेटीच्या प्रशिक्षणार्थ्याच्या बोलक्या
छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)आरसेटी ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण केंद्र भंडारा व्दारे आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी प्रशिक्षणार्थी विदयार्थ्याच्या नजरेतून काढलेल्या सुंदर छायाचित्रांचे प्रदर्शनाचे उदघाटन
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
तीस प्रशीक्षणार्थ्याना पंकज मिसाळ यांनी प्रशिक्षण दिले .उदया या प्रशिक्षणाचा समारोप आहे.या फोटोमध्ये जिल्हयातील जनजीवन,उत्पादने,वन्य प्राणी, निसर्ग व विविध उत्पादनांचे छायाचित्रण केले होते.यावेळी संस्थेचे संचालक मिलींद इंगळे तसेच नाबार्डचे व्यवस्थापक देवेंद्र हेडावून ,अग्रणी बॅक व्यवस्थापक गणेश तइकर ,प्रेक्षीत गजभिये उपस्थित होते.
या प्रदर्शनात अतिशय बोलके फोटो लावण्यात आले.या फोटोची निवड श्री.पंकज मिसाळ व श्रीकृष्ण टेकाडे यांनी केली होती.52 उत्कृष्ट फोटोपैकी 30 फोटेा निवडण्यात आले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला.आणि त्यांना मार्गदर्शन केले.शासकीय योजनांचा लाभ घेत छोटी सुरवात करावी व मेहनतीने व्यवसाय पुढे नेण्याचे त्यांनी विदयार्थ्याना सांगितले.
आरसेटी मार्फत ग्रामीण विदयार्थ्याना स्वरोजगारासाठी प्रशीक्षण दिल्या जातात.