आशाताई बच्छाव
मेरा खुर्द येथे वरली मटक्याचा खुलेआम खेळ सुरू ….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- चिखली मेरा खुर्द येथे खुलेआम वरली मटका सुरू आहे देवळराजा ते चिखली रोडवर मेराफाटा परिसरात वरली मटक्यासह झुगाराचा नंगा नाच सुरू असुन मोठ्या प्रमाणात समाजजिवनावर विपरीत परिणाम होत आहे.सद्या भरोसा मेरा खुर्द परिसरात डब्बल चिट्टी,आँनलाईन,मोबाईल अश्या वेगवेगळ्या पध्दतीने मटका सुरू आहे मटका चालविण्याचे काम थेट मालक तर काही ठिकाणी एंजटाचा वापर केला जातो काही ठिकाणी फिरत्या स्वरूपात मटका घेतला जातो मटका कशा पध्दतिने आणि कसा घ्यायचा त्याचे कलेक्शन कोठे जमा करायचे ते मालकापर्यत कसे पोहचायचे तेथून गिर्हाकायकाचे पेंमेट कसे भागवायचे याची स्वंतत्र यंत्रना आहे मात्र यंत्रनेकडे सहसा कोनी लक्ष देतच नाही दिले तरी ते तात्पुरत्या स्वरुपाचे असते त्यांनतर सोईस्कर रित्या दुर्लक्ष करण्याची परंपरा बनली आहे अंढेरा येथे किती अधिकारी आले आणि किती गेले मात्र मेरा खुर्द येथे वरली मटका सुरूच राहिला नवा अधिकारी अला कि कारवाईचा फार्स करायचा चार दिवस उलटले की पुन्हा अड्डे सुरूच वरली मटका कोठे कसा सुरू आहे याची माहिती सर्वानाच असते मात्र सामान्य भितीने तर काहिजन ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जाणीवपर्वक कानाडोळा करतात या मटक्यात गुरफटलेली अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असुन सदर या अवैध धंधामुळे नेहमी बाजार करणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन तर करावायाच लागतो या ठिकाणी लोका मधिल देवानघेवान होत असतात तर कधी कधी या वादाचे स्वरूप भांडणात परिवरतीत होतात दुकानदार बाजार करण्यास येणाऱ्या लोकांना व महिलाना व लहान मुलाना चांगला मनस्ताप सहन करावा लागतो आहे हे ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यांना माहित असून सुद्धा माहीत नसल्यासारखे वागत आहे या ठिकाणी कुठेतरी पाणी मुरत असल्याची सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे हे थांबवणार कसे हाच खरा प्रश्न आहे मेरा खुर्द येथे दुकानाच हाँटेल पानटपर्याचा सहारा घेत मेरा खुर्द(फाटा,)परिसरात खुलेआम आकडे घेतले असुन वरली मटक्याचा व्यवसायात नव्याने प्रकाश पडला आहे काही प्रतिनिधी यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी
अवैध रित्या व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध जुगारावर आमची करडी नजर असून यांच्याविरुध्द मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्या व्यतीरीक्त नागरिकांची तक्रारी असल्यास त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा. त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार यानी दिली आहे