Home भंडारा विद्यार्थिनींनी राख्या व संदेश पत्र पाठवून व्यक्त केल्या सैनिकांप्रति कृतज्ञता

विद्यार्थिनींनी राख्या व संदेश पत्र पाठवून व्यक्त केल्या सैनिकांप्रति कृतज्ञता

55
0

आशाताई बच्छाव

1000677565.jpg

विद्यार्थिनींनी राख्या व संदेश पत्र पाठवून व्यक्त केल्या सैनिकांप्रति कृतज्ञता

जे. एम. पटेल महाविद्यालयात धागा शौर्य का, राखी अभिमान की उपक्रम

 

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी)- आपला भारत देश संस्कृतीने नटलेला देश आहे. भारतात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. विविधतेत एकता नटलेली आढळते. बहीण भावाचे नाते घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण होय. आपल्या देशातील सैनिक डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशाच्या रक्षणाकरीता सण असो की नसो आपले कार्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. त्यामुळे आपण सुखाने जीवन जगत आहोत. आपल्यासाठी ते अहोरात्र ऊन, पाऊस, थंडी यांची तमा न बाळगता मेहनत करीत आहे. तर आपले देखील कर्तव्य बनते की त्यांच्यासाठी काही तरी करावे.
आपल्या कुटुंबापासून दूर राहत असल्याने देशाच्या रक्षण करत्याला राखी व संदेश पाठवून त्यांच्या कार्याची दखल घेतल्यास त्यांना काम करण्यास अधिक प्रोत्साहन व आनंद प्राप्त होतो. गृहअर्थशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षण विभाग, एनसीसीच्या विद्यार्थिनींनी राखी बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन राख्या बनविल्या व देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति भावनिक कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश सादर करण्यात आले. या करीता विद्यार्थिनी सक्रिय सहभाग दर्शविला. जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी पत्रकार तथा समाजसेवक विलास केजरकर यांच्याकडे राख्या व संदेशरूपी पत्र सुपूर्त करण्यात आले.
या सोहळ्याला प्रेरणा देणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हस्ते या कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थित हिन्दी विभाग प्रमुख डॉ. विनी ढोमणे, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजया कन्नाके, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोमी बिष्ट, एनसीसी चे कार्यक्रम अधिकारी, डॉ. जितेंद्र किरसान, डॉ. भावना राय, डॉ. जया पाटील, मनीषा बारापात्रे, शारदा कुलवंते यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here