
आशाताई बच्छाव
सामाजिक कार्यकर्ते सदानंद धारगावे यांचा वाढदिवस विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार करून साजरा
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोज मंगळवार ला विश्राम भवन भंडारा येथे, सामाजिक कार्यकर्ते सदानंद धारगावे यांच्या वाढदिवस राजमाता जिजाऊ,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्कारमूर्ती सदानंद धारगावे उपस्थित होते . तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नम्रता ताई बागडे उपस्थित होत्या., प्रमुख अतिथी म्हणून मनीषा भांडारकर विदर्भ महिला आघाडी कार्याध्यक्ष , विशेष अतिथी म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे उपस्थित होते .सर्वप्रथम सर्व महिलांचे उपस्थितीत पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर शितल नागदेव यांच्या चमूने स्वागत गीत सादर केले. त्यानंतर नम्रता बागडे ,मनीषा भांडारकर , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव टेंभुर्णे,सदानंद धारगावे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर सत्कारमूर्ती सदानंद धारगावे यांचा वाढदिवसाचे औचित साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी शाल, सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ , देऊन सत्कार केला.सामाजिक महिला संघटनेच्या वतीने नम्रता बागडे, स्नेहा साखरवाडे ,वर्षा पाटील , मनीषा भांडारकर यांच्यावतीने सुद्धा शाल, पुष्पगुच्छ , सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते भीमराव टेंभुर्णे यांच्या हस्ते सुद्धा पुष्पगुच्छ, शाल देऊन सत्कार करण्यात आला. डॉ अक्षय कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा यांच्या वतीने सुद्धा महिलांचा सन्मानचिन्ह , पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.महिला अधिकार सामाजिक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष सदानंद धारगावे यांचा वाढदिवस विविध सामाजिक क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह, मानपत्र, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने शितल नागदेवे, मनीषा खोब्रागडे,मनीषा भांडारकर,नम्रता बागडे , स्नेहा साखरवाडे, स्वर्णमाला गजभिये, , संघमित्रा चव्हाण, उत्तमा गडपायले,पौर्णिमा खांडेकर ,वर्षा पाटील , जिजा कोल्हे ,शीतल गेडाम ,, वैशाली मंजूरकर, प्रमिला टेंभुरकर, छबीला नंदेश्वर , कमला रंगारी ,रत्नाताई खंडारे, अलका रामटेके, वैशाली राजपूत, वैशाली टेंभुरकर, अलका मेश्राम, माधुरी साठवणे, योगिता धांडे, कीर्ती भांडारकर, प्रीती देशमुख, उज्वला वैद्य, निशा वाहने, संघमित्रा चव्हाण, वर्षा रामटेके,वर्षा पाटील, पौर्णिमा खांडेकर,यांचा समावेश आहे.