
आशाताई बच्छाव
बुद्ध अरण्यवास कोठरीच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
कोठरी बुद्ध विहाराकडे जाणाऱ्या २.१० कोटी रुपयांच्या रस्त्याचे आ. डॉ. देवरावजी होळी यांनी केले भूमिपूजन.
भंते भगीरथ यांचे सह बौद्ध समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
कोठरी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
बुद्ध अरण्यवास कोटीच्या विकासाकडे आपण जातीने लक्ष देत असून या ठिकाणी प्राथमिक स्तरावरील सोयी सुविधा लवकरात लवकर व्हाव्यात याकरिता आपण प्राधान्याने लक्ष देत असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोठरी येथील २.१० कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बांधकाम भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी सरपंच निताताई पुडो, उपसरपंच छत्रपती दुर्गे, धर्मप्रकाश कुकुडकर, चंद्रगुप्त कोटांगले, संगीता साखरे, गौतम मेश्राम, विलास दहिवले, गौतम खोब्रागडे, निमसरकार, अनिल भैसारे, उत्तम मेश्राम, नाजूक वाळके, वेनुदास तुरे तसेच बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते