
आशाताई बच्छाव
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहाने सहभागी व्हा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह आदिवासी संघटना व मित्र परिवाराचे आवाहन
९ ऑगस्ट सकाळी ७:३० वाजता इंदिरा गांधी चौकात मुले व मुलींसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आमदार डॉक्टर देवराव होळी, आदिवासी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने गडचिरोली येथे सकाळी ७:३० वाजता खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा इंदिरा गांधी चौकातून चंद्रपूर रोड मार्गावर आयोजीत करण्यात आली आहे. त्यामध्ये मुलांसाठी ५ किलोमीटर तर मुलींसाठी ३ किलोमीटर दौड चे आयोजन केले आहे . यामध्ये सहभागी मुलांना प्रथम पारितोषिक ७ हजार दुसरे ६ हजार तिसरे ५ हजार चौथे ४ हजार पाचवे ३ हजार सहावे २ हजार तर मुलींना प्रथम पारितोषिक ५ हजार दुसरे ४ हजार तिसरे ३ हजार चौथे २ हजार पाचवे १ हजार रूपये बक्षीस व सोबत एक शिल्ड देण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेमध्ये अधिकाधिक मुला-मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे सह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे , बादल मडावी ,कैलास गेडाम, भुषण मसराम, रुपेश सलामे,उमेश उईके यांचेसह विवीध आदिवासी संघटना व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.