
आशाताई बच्छाव
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जनतेला व्हावा याकरिता एमएलएकॅम्पचे आयोजन
आमदार डॉक्टर देवरावजी होळी
विवेकानंद नगर मध्ये शासनाच्या योजनांची अंमलबजावणी कॅम्प कार्यक्रमाचे आयोजन
मा. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील शासन योजनांची अंमलबजावणी चे एमएलएकॅम्प गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून एमएलए कॅम्पच्या माध्यमातुन शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी व सर्वसामान्य जनतेला शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा करिता या कॅम्पचे आयोजन करण्यात येत असून माझ्या गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये ५० लोकांची टीम बनवून आपण मोठ मोठ्या गावात कॅम्पच्या माध्यमातून तर लहान गावामध्ये घरोघरी संपर्क करून शासन योजनांचे फॉर्म भरून जनतेला त्याचे लाभ मिळवून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मा. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील एमएलए कॅम्पच्या शुभारंभ प्रसंगी केले.
विवेकानंद नगर गडचिरोली येथे शासनाच्या योजनांची अंमलबजावणी एमएलए कॅम्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या एमएलए कॅम्पच्या माध्यमातून ईमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्याचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा मानस आहे.
याप्रसंगी प्रमोद जी पिपरे, माजी नगराध्यक्ष त्याचा जिल्हा महामंत्री सौ योगिता पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, एमएलएकॅम्प चे गौरव नागपूरकर, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे , तालुका महामंत्री बंडू झाडे ,शहर महामंत्री विवेक बैस, विनोद देवोजवार, प्राध्यापक ऊराडे, मोरेश्वर भांडेकर रुपेश चौधरी यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते