Home नंदुरबार नंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश,

नंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश,

35
0

आशाताई बच्छाव

1000616359.jpg

नंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश,             नंदूरबार,(हेमंत जगताप ब्युरो चीफ)- मागील गेल्या एक ते दोन महिन्यापासून नंदुरबार शहरातील साक्रीनाका परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता, अखेर एक ऑगस्ट रोजी बिबट्यास जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तीन दिवसानंतर धुमाकूळ घालणारा बिबट्या, अखेर जेरबंद करण्यास नंदुरबार वन विभागाला यश मिळाले आहे, व परिसरातील नागरिकांनी सुटकेचा विश्वास टाकला आहे. नंदुरबार शहरात मागील काही महिन्यापासून बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचे परिसरातील नागरिकांमधून तक्रार प्राप्त झाली होती, त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसा,र नंदुरबार शहरातील इमाम बादशाह दर्गा परिसरात असलेल्या पीर तलाव, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल, व तलाव पाडा परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते, त्याअनुषंगाने दिनांक 1 ऑगस्ट रोजी पिंजरे लावल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, आज चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास, नंदुरबार शहरालगत असलेल्या साक्री नाका परिसरातील इमामबादशा दर्गा नजीक असलेल्या, हिरा इंग्लिश मीडियम स्कूल जवळ लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात धुमाकूळ घालणारा व परिसरातील नागरिकांत दहशत पसरविणारा एक बिबट्या अखेर जेरबंद झाल्याचे काही नागरिकांना व वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशिय संस्था नंदुरबार च्या सदस्यांना आढळून आले, त्यानुसार नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी बिबट्यास जेरबंद करून नंदुरबार वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात सुरक्षितपणे आणण्यात आले आहे, सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून, साधारण त्याचे वय तीन ते चार वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे, सदरची कारवाई नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक कृष्णा भंवर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक उपवनसंरक्षक संजय साळुंखे, तसेच सहाय्यक उपवनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल बिलाल शहा, तसेच वन्यप्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य यांनी बिबट्या जेर बंद करण्यास परिश्रम घेतले, यावेळी वन्यजीव प्राणी संरक्षण आणि बहुउद्देशीय संस्था नंदुरबारचे संस्थापक अध्यक्ष संजय वानखेडे, राहुल कैलास खैरनार कैलास देसाई, चेतन आखाडे, चेतन पाटील, आशिष ठाकूर, चेतन अहिरे, रोहित पिंपळे, गणेश बागले,सनी शिरसाठ गणेश सोनवणे आदींनी मिळून ही कार्यवाही केली.

Previous articleजनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह – माजी खासदार उन्मेशदादा पाटील
Next articleविधानसभा निवडणुकी साठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे आव्हान….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here