Home जळगाव जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह – माजी खासदार उन्मेशदादा पाटील

जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह – माजी खासदार उन्मेशदादा पाटील

39
0

आशाताई बच्छाव

1000617613.jpg

जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भगवा सप्ताह – माजी खासदार उन्मेशदादा पाटील
———————————————
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या प्रेरणेने भगवा घेऊन आम्ही शिवसैनिक गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहोत.
तालुक्यातील जनता लहान लहान समस्यांनी त्रस्त आहे. मात्र लोकप्रतिनिधी जमिनीवर न राहता जमिनी घेण्यात व्यस्त आहे.
उदासीन लोकप्रतिनिधी आणि निगरगट्ट महायुती सरकार या जात्यात जनता भरडली जात आहे. या सर्व जनतेला घेऊन शिवसेना लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहे. अशी गर्जना शिवसेनेचे नेते माजी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केली आहे.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गोरखपूर येथील शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश चव्हाण,
विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, बाळासाहेब पाटील हिंगोणेकर, सुनील गायकवाड, तालुका प्रवक्ते संदीप घोरपडे, सविताताई कुमावत, भाऊसाहेब पाटील, रवींद्र चौधरी, शैलेंद्र सातपुते, महेंद्र जैस्वाल, मारोती काळे, संजय पाटील, मुकेश गोसावी, संजय चौधरी, पप्पू राजपूत, आदी मान्यवर उपस्थित होते.
गोरखपुर (पिंपरखेड तांडा),32 नंबर तांडा,वलठाण तांडा,वलठाण गाव,पाटणा,चंडिकावाडी जूनपाणी,
चत्रभुज तांडा,शिंदी,ओढरे,
गणेशपूर या ठिकाणी शाखा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.*सायंकाळी आठ वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गणेशपूर येथे शेतकरी संवाद साधत तालुक्याच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला*. यावेळी गोरखपुर (पिंपरखेड तांडा) शाखा प्रमुख दिलिप चव्हाण, 32 नंबर तांडा शाखा प्रमुख दिनेश राठोड,वलठाण तांडा शाखा प्रमूख सोमनाथ जाधव,वलठाण गाव शाखा प्रमुख विक्की राठोड,पाटणा शाखा प्रमुख दिपक पाटील,चंडिकावाडी शाखा प्रमुख योगेश राठोड,जूनपाणी शाखा प्रमुख अंकुश राठोड,
चत्रभुज तांडा शाखा प्रमुख सोमनाथ राठोड ,शिंदी शाखा प्रमुख हेमंत फटांगरे, ओढरे शाखा प्रमुख नवनाथ पवार,गणेशपूर शाखा प्रमुख त्र्यंबक जाधव यांच्यासह मान्यवर कार्यकर्ते, जेष्ठ श्रेष्ठ शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleजुनपाणी शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या
Next articleनंदुरबार वनविभागाच्या कारवाईस यश,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here