Home अमरावती भा.ज.पाला शिवसेना नेत्यांचा धमकी वजा इशारा;”राज्यपाल पदासाठी आठ दिवसाची वाट पाहणार, मग”सांगू...

भा.ज.पाला शिवसेना नेत्यांचा धमकी वजा इशारा;”राज्यपाल पदासाठी आठ दिवसाची वाट पाहणार, मग”सांगू शिवसेना नेते आनंद अडसूळ नाराज.

71
0

आशाताई बच्छाव

1000617600.jpg

भा.ज.पाला शिवसेना नेत्यांचा धमकी वजा इशारा;”राज्यपाल पदासाठी आठ दिवसाची वाट पाहणार, मग”सांगू शिवसेना नेते आनंद अडसूळ नाराज.
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यपाल पदासाठी पुढील ८ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणांचा जात वैधता प्रमाणपत्राचे प्रकरण पुन्हा बाहेर काढणार अशी असा धमकीवजा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपला दिला आहे. नवनीत रानाच्या जात वैधता खटल्याबाबत पुनर्विचार याचिका करणार असल्याचे ही आडसुळांनी सांगितले. अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपा यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, नवनीत राणा विरोधात घटनेच्या माध्यमातून जी कायदेशीर प्रक्रिया करायची ती आम्ही करत होतो. मात्र अमित शहा यांनी तुम्हाला राज्यपाल बनवणार आहोत, अमरावतीचे जागा आम्हाला सोडा असा शब्द मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यासमोर मला दिला होता. या अपेक्षेने आम्ही थांबलो होतो. आदर म्हणून तिघांच्या उपस्थितीत आम्ही होकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीने माझ्या नावाची राज्यपाल पदाची शिफारस तत्काळ गृहमंत्र्याला कडे पाठवली. आम्ही विश्वास ठेवला, निवडणुका झाल्या, त्यांची सत्ता आली त्यामुळे दिलेला शब्द पाडणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आता जी एक यादी निघाली त्यात नाव नाही, तरी मी संयम दिवसांनी जाऊन भेटलो. त्यांनी थोडं थांबावे लागेल असा त्यांनी सांगितले असल्याचा अडसूळांनि म्हटल. तसेच जेव्हा भाजपसोबत सरकार बनवण्याचा सुरू होतो तेव्हा केंद्रात २ मंत्री पदे आणि २ राज्यपाल पदे दिवसा शब्द देण्यात आला होता. निवडणूक झाल्यावर तो शब्दही भाजपने पाळला नाही. स्वातंत्र्य कारभार असलेले एकच मंत्री पद शिवसेनेला दिले. राज्यपालाच्या आश्वासनाबद्दल आम्ही थांबलो होतो. मी संयम ठेवला आहे अजूनही ८-१० दिवस वाट पाहणार त्यानंतर सुप्रीम कोर्टात नवनीत राणा बाबत जो निकाल दिला त्यावर फेरविचार याचिका दाखल करणार महिन्यापूर्वी दिलेल्या शब्द पाळायला हवा होता मात्र अजूनही पूर्ण केला नाही असं आनंदराव अडसूळ यांनी सांगितले. दरम्यान अमित शहाणी शब्द दिला, त्यामुळे अमरावतीतून माघार घेतली. जर मी निवडणूक लढवली असती तर चांगल्या मताधिक्याने निवडून आलो असतो आणि आज कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असते. माझ्या पक्षात मीच ज्येष्ठ वेळा खासदार राहलो. संसद रत्न मिळाला आहे . अटल बिहारी वाजपेयी काळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून कामही केले आहे. त्यामुळे मी निवडणूक लढलो असतो तर जिंकून मंत्री पद मिळाले असते. मात्र भाजपाला जागा सोडल्यामुळे माझ्या हातून खासदारकी, मंत्रीपद सगळेच गेले आणि हाती अजूनही काही मिळाले नाही अशी खंत आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखविले. आनंदराव अडसूळ जी वक्तव्य करतायेत यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते. वयाप्रमाणे त्यांना आराम करण्याची गरज आहे आजही ते जसा आम्हाला ब्लॅकमेल करत होते तसं देशाच्या गृहमंत्र्याचे नाव घेऊन ब्लॅकमेल करता येत. नवनीत राणा विरोधात अडसूळ यांनी काम केले. अमरावतीत येऊन नवनीत राणांना पाडण्यासाठी यंत्रणा लावली. नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द त्यांनी अमित शहाणा दिला होता. मात्र त्यांनी नवनीत रानांना पाडण्याचे काम केले. राज्यपाल बनवणे अशी विधाने करून त्यांची मानसिकता संतुलन बिघडले आहे. त्यांना चांगल्या डॉक्टर कडे उपचाराची गरज आहे. त्यासाठी जो खर्च येईल तो करण्यास मी तयार आहे असा खोचक पलटवार करत रवी राणांनी आनंदकारले आहे.

Previous articleजिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा म्हैसपूर येथील तीन विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
Next articleजुनपाणी शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here