Home नाशिक समाजकारणातून राजकारणात प्रवेश घेण्याची इच्छा.( राजेंद्र चौरे)

समाजकारणातून राजकारणात प्रवेश घेण्याची इच्छा.( राजेंद्र चौरे)

360
0

आशाताई बच्छाव

1000612818.jpg

समाजकारणातून राजकारणात प्रवेश घेण्याची इच्छा.( राजेंद्र चौरे).                                                    ( नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे)

जून महिन्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाला या निकालात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भास्कर भगरे( सर) यांच्यासारखे एक शिक्षक या निकालात चांगल्या मताधिक्याने विजयी झाले प्रस्थापितांना धक्का देत त्यांच्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच भगरे सरांचा आदर्श लक्षात घेत बहुतांशी नोकर वर्ग वेगवेगळ्या निवडणूक सहभाग घेत आहेत.
अशातच बागलाण विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने विविध जिल्हा परिषद गटातील नागरिक किंवा लोकप्रतिनिधी आपले नशीब आजमण्यासाठी उत्सुक आहेत. यात एक नाव तालुक्याचे केंद्रस्थानी व केंद्रबिंदूवर ठरत आहेत ते म्हणजे राजेंद्र चौरे (सर) चौरे हे भारतभर जैन धर्मियांचे प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्रा मधील मांगीतुंगी या गावातील रहिवाशी त्यांचा जन्म 1985 साली याच मांगीतुंगी( भिलवाड)गावी झाला. घरची परिस्थिती अगदी अनुकूल परंतु शिक्षणाची कास मनाशी बाळगून चौरे यांनी m.a.bed पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कालांतराने त्यांना मराठा विद्या प्रसारक समाज या महाराष्ट्रातील दोन नंबर नावाजलेल्या संस्थेत शिक्षक म्हणून नोकरी करण्याची संधी लाभली. यात त्यांनी निरपुर,जायखेडा व टेंभे या ठिकाणी आपली सेवा दिली. आता सध्या टेंभे (व) इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी करत असताना आपण समाजाच काही देणं लागतो. हा वसा त्यांनी मनाशी बाळवून समाजकार्यात सहभाग घेतला. त्यात विशेष बाब त्यांनी शेतकरी, मजुर, नोकरदारांच्या संबंधात विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी आपला आवाज उठवला आहे. यात विशेष बाब शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, यांसारख्या संघटनेच्या विविध आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आहे यात रास्ता रोको, कांदा प्रश्न, पीक विमा, हमीभाव, यांसारख्या विविध मुद्द्या साठी शासन दरबारी आपली प्रखड भूमिका मांडत आहे. चौरे यांनी बागलाणचा पश्चिम पट्ट्यातील आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते कायमच अग्रेसर आहे यात एसटी महामंडळाकडून होणाऱ्या बस सेवेची दिरंगाई, धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांना होणारा त्रास, स्थानिक नोकरदारांकडून होणारे त्रास, नागरिकांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न, विज संदर्भात प्रश्न यांसारखे अनेक मुद्यां वरुण शासन दरबारी आपले निवेदन व कार्यकर्त्यांसह उपस्थित राहतात व आदिवासी समाजाला 100% न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात चौरे यांचा कामाचा व समाजसेवक वसा बघत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने त्यांना सहकार सेना जिल्हा उपप्रमुख या चांगल्या पदावर नियुक्ती केली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य बिरसा आर्मी या संघटना वरती प्रवक्ता या पदावर काम करीत आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आपला उमेदवार घोषित सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच चौरे यांना 2024 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करावी यासाठी त्यांचे समर्थक व शिवसेना गटाचे कार्यकर्ते आग्रही आहेत.
चौरे यांना आपल्या घरातुन कुठल्याही प्रकारचा राजकीय वारसा नसताना ते या क्षेत्रात आगेकुच करत आहेत. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा बागलाण वासियांना आहे.

Previous articleजडीबुटी दिनानिमित्त नित्य योग वर्ग पतंजली व योग सहयोग कडून जुनी आयुडीपी परिसरात वृक्षारोपण
Next articleगडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा आमदार डॉ. देवरावजीं होळी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here