आशाताई बच्छाव
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड, दि. 19 जुलै :- शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते पार पडला. सदर स्पर्धेतील विजेत्यांना अधिष्ठाता डॉ. देशमुख यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याबाबत विद्यार्थ्यांना समाजात जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित केले.
वत्कृत्व स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातल विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. एकूण 100 विद्यार्थ्यांनी रांगोळी, पोस्टर, कविता, घोषवाक्य, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अधिष्ठाता यांनी अवयवदानाच्या महत्वावर प्रकाश टाकला त्याचबरोबर अवयवदान अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित रॅलीमध्ये मोठया प्रमाणात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
या प्रसंगी डॉक्टर संजय मोरे, प्राध्यापक व विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वाय.एच. चव्हाण यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले व अवयवदान ही चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत सिमीत न राहता सर्व लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे सांगितले. सदरील कार्यक्रमामध्ये या महाविद्यालयातील डॉ. प्रल्हाद राठोड व डॉ. मुकुंद कुलकर्णी तसेच शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉ. प्रज्ञा देशपांडे, डॉ. डोळे व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेतील गुणवंतांची निवड करण्याकरिता स्पर्धेचे निरिक्षक म्हणुन डॉ. हेमंत गोडबोले, डॉ. चंडालिया, डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. सुधा करडखेडकर, डॉ. उमेश अत्राम, डॉ. अनुजा देशमुख यांनी काम पाहीले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. नाजीमा मेमन व ईतर विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.अनिकेत वानखेडे, डॉ. तेजस्वीनी बसले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. सचिन तोटावार यांनी विभागाच्या वतीने उपस्थितांचे आभार व्यक्त केले.