Home अमरावती गुन्हेगारी वाढली; कारागृहे हाउसफुल, नवीन कारागृहाचा प्रस्ताव प्रलंबित. कारागृहात प्रत्यक्षात ४० हजार...

गुन्हेगारी वाढली; कारागृहे हाउसफुल, नवीन कारागृहाचा प्रस्ताव प्रलंबित. कारागृहात प्रत्यक्षात ४० हजार ४२८ कैदी बंदिस्त.

57
0

आशाताई बच्छाव

1000562823.jpg

गुन्हेगारी वाढली; कारागृहे हाउसफुल, नवीन कारागृहाचा प्रस्ताव प्रलंबित. कारागृहात प्रत्यक्षात ४० हजार ४२८ कैदी बंदिस्त.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून या दिवसात दिवस वाढ होत चालली आहे. परिणामी राज्यातील कारागृह ही सुधारणा व पुनर्वसन हे नव्हे तर आता गुन्हेगाराची हब म्हणून नाव रूपास येत आहे, तसेच देश विदेशातील बंदिस्त कायद्यामुळे ही हाउसफुल झाली असून राज्यात ६० कारागृहामध्ये ४० हजार ४२८ कैदी बंदिस्त आहेत. अधिकृत बंदी क्षमतेपेक्षा १३ हजार ३१८ कधी जास्त ठेवण्यात आले आहेत. कारागृहात निम्मे मनुष्यबळावर क्षमतेपेक्षा दुप्पट कायद्यांचा भार आला आहे. त्यामुळे कारागृहाचे अंतर्गत व बाहेरील सुरक्षा देत मोठे गुन्हे घडत आहेत हे चित्र संपूर्ण राज्यातील कारागृहामध्ये असून क्षमतेपेक्षा दुप्पट बंदी वान आहेत. राज्यभरात गुन्हागारीचे प्रमाण वाढल्यामुळे आता कारागृहात बंदी ठेवायला अडचणी येत असल्याचे वास्तव आहे
कैदी संख्या जास्त आणि मनुष्यबळ कमीही नित्याची बाब झाली आहे. त्यामुळे अनेक कारागृहांमध्ये होमगार्ड ची सुरक्षित साठी मदत घेण्यात येत आहे. विशेषता शिपाई पदाची कमतरता ही कारागृह अधीक्षकासमोर मोठी समस्या उद्भवत आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, येरवडा, संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह देश-विदेशातील गंभीर गुन्ह्याच्या आरोपी बंदिस्त असल्याने तुकड्या मनुष्यबळामुळे अंतर्गत व बाह्य सुरक्षेचा मोठा ताण यंत्रणेवर येत असल्याचे वास्तव आहे. बंदी क्षमता: २७ हजार ११०, प्रत्यक्षात बंदिस्त कैदी: ४० हजार ४२८, सिद्ध दोष: ७४७७(पुरुष: ७१७०, स्त्री: ३०६, तृतीयपंथी: १) न्यायधीन: ३२४५३(पुरुष: ३१०८६, स्त्री १३५१, तृतीयपंथी: १६) तर स्थान बद्ध व इतर ४९८”कारागृहात बंदीजणांची गर्दी वाढली हे वास्तव आहे. नव्याने १०ते१२ कारागृहाच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. खुले कारागृहाच्या क्षमता वाढीमुळे गर्दी कमी करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत गरीब कायद्यांना न्यायालयीन मदतीने द्वारे कारागृहातून बाहेर पाठविण्यात येत आहे. गत वर्षभरात १८९७ कैदी खुले कारागृहात पाठवले आहेत”अशी माहिती डॉ. जालिंदर सुपेकर प्रभारी तुरुंग महानिरीक्षक, यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here