Home गडचिरोली भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!

भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!

58
0

आशाताई बच्छाव

1000562171.jpg

भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे..!

कंत्राटदारांची चौकशी करण्याची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची माहिती!

अहेरी/गडचिरोली ,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात आले.सदर पूल पहिलाच पावसात वाहून गेल्याचे दिसत आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे.

पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.

Previous articleजम्मू-कश्मिरमधील भ्याड हल्ल्यांच्या विरोधात शिवसेनेची तीव्र निदर्शने
Next articleअ. भा. आ. वि. परिषदेच्या शिष्टमंडळाने आमदार डॉ. देवरावजी होळी यांची घेतली भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here