आशाताई बच्छाव
लाडकी बहीण योजनेसाठी दलाल सक्रिय ; एका दलाल महिलेवर गुन्हा दाखल..
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
संजय गांधी श्रावणबाळ,लाडकी बहीण आदी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या वंदना म्हस्के (रा. हातमाळी, ता., जि. छत्रपती संभाजीनगर) या महिलेवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्यासमोर गान्हाणे मांडल्यानंतर त्यांनी स्वतः महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तलाठी विशाल मगरे यांनी फिर्याद दिली. बंद झालेले अनुदान मंजूर करण्यासाठी व ‘लाडकी बहीण योजनेचा’ लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के या गोरगरीब महिलांकडून पैसे उकळत होत्या. पैसे देऊनदेखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांना विचारले असता त्या धमक्या देतात म्हपान महिलांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती. करमाडचे पोलिस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रामेश्वर टाकणे तपास करत आहे.
महिलांनी तहसीलदार रमेश मुणलोड
आरोपी महिला प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष ?
वंदना मस्के या महिलेने संजय गांधी, श्रावण बाळ योजना कार्यालयात प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटर हेड वापरून योजना मंजूर करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते. प्रहारच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकला नाही.