Home बुलढाणा जम्मु काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा येथे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

जम्मु काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा येथे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र निषेध….

40
0

आशाताई बच्छाव

1000561954.jpg

जम्मु काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बुलडाणा येथे शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र निषेध….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ

बुलढाणा :- जम्मु – काश्मीर मधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश यांच्यासह २ जवान शहीद झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख श्री जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील चौकात तीव्र निषेध करण्यात आला. तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दहशतवादी हल्ले रोखण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. काश्मीर है हिंदुस्थान का, नाही किसी के बाप का, हिंदुस्थान जिंदाबाद , केंद्र सरकार निषेध असो निषेध असो या घोषणा देत काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी उप तालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, संजय गवळी, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, आशिष बाबा खरात, युवासेनेचे उप जिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, श्याम खडके, सरपंच रामेश्वर बुधवत, भगवान नरोटे, समाधान जाधव, राहुल जाधव, दुर्गादास नाटेकर, उमेश नाटेकर, शफीक बागवान, अमोल जुमडे, अशोक महाराज, अनिल राणा, संभाजी शिंदे, वीरेंद्र बोर्डे, सचिन मिसाळ, सचिन पाटील, रामेश्वर शिंदे, बबन खरे, मधुकर महाले, श्रीनाथ इंगळे, रामेश्वर शिंदे, सोमनाथ शिरसाठ, शिववसिंग कवाळ, महादू गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleपर्यटनस्थळी रील्स बनवाल तर होईल कारवाई; जिल्हा पोलिसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
Next articleलाडकी बहीण योजनेसाठी दलाल सक्रिय ; एका दलाल महिलेवर गुन्हा दाखल..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here