Home जालना दर्शनाहून परतणा-या वारक-यांची जीप विहिरीत कोसळली; सातजण ठार: जालना जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर

दर्शनाहून परतणा-या वारक-यांची जीप विहिरीत कोसळली; सातजण ठार: जालना जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर

138

आशाताई बच्छाव

1000559642.jpg

दर्शनाहून परतणा-या वारक-यांची जीप विहिरीत कोसळली; सातजण ठार: जालना जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 19/07/2024
राजूर येथून जवळच असलेल्या वसंतनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत जालना येथून येणाऱ्या काळी पिवळी जीप मोटारसायकल स्वरास वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायवरचा ताबा सुटून जीप विरीहित कोसळली त्यात सात जण मृत्यूमुखी पडले. ही घटना खडेश्वरी बाबाजी यांच्या शिवशक्ती आश्रम असलेल्या बाजूच्या विहिरीजवळ साडेचार वाजेच्या दरन्यान घडली.गाडीतील मृत हे पंढरपूर यात्रेवरून गावाकडे परत येत असताना हा भीषण अपघात घडला. मृतामध्ये चनेगाव व तपोवन येथील नागरिकांचा समावेश होता. गाडीत एकूण 12 जण होते पैकी 4 जणांना वाचवण्यात गाडी ड्राइव्हर बाबुराव हिवाळे व वसंतनगर येथील स्थानिकांना यश मिळाले. तर 7 मृत्यू झाल्याची माहिती आहे तर एक जण जखमी आहेत. मृतामध्ये प्रल्हाद महाजन, ताराबाई मालुसरे, नंदा तायडे, प्रल्हाद बिटले, नारायण किसण निहाळ, चंद्रभागा घुगे यांचा समावेश आहे. 3 जण सुखरूप असून 2 जणांना शासकीय रुग्णालय जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दोन अग्निशमक पथक यांच्यासह चंदनझीरा व हसनाबाद पोलिसांनी भेट देऊन बचावकार्य केल.घटनास्थळी क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. आणखी काही मृतदेह विहिरीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच बदनापूर विधानसभा मतदार संघांचे आमदार नारायण कुचे, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी भेट देऊन दुःख व्यक्त केले.

Previous articleअलिबाग तालक्यातील मेढेखार गावी येथील मोहरममध्ये हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन !
Next articleआंबेगाव येथे पार पडले नॅशनल बांबू मिशन चर्चासत्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.