Home जालना जानेफळ पंडित येथे मयूर बोर्डे यांचे विमा कंपनीच्या अन्याया विरोधात अन्नत्याग उपोषण

जानेफळ पंडित येथे मयूर बोर्डे यांचे विमा कंपनीच्या अन्याया विरोधात अन्नत्याग उपोषण

138
0

आशाताई बच्छाव

1000559294.jpg

  • जानेफळ पंडित येथे मयूर बोर्डे यांचे विमा कंपनीच्या अन्याया विरोधात अन्नत्याग उपोषण
    जाफराबाद तालुका प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
    दिनांक 18/07/2024
    सविस्तर वृत्त असे की, जानेफळ पंडित येथे शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे . या आंदोलनाला तीन दिवस होऊन गेले. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, जाफराबाद तालुका येथील तहसीलदार भेटून गेल्याची मयूर बोर्डे यांनी सांगितले परंतु त्यांनी विमा कंपनी वरती कारवाई करण्याचे कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही . आश्वासन देण्याचे कबूल करतात परंतु ते आश्वासन थातुर मातुर असल्यामुळे मी ते स्वीकारले नाही .असे मयुर बोर्डे यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, जोपर्यंत विमा कंपनीवर तुम्ही कारवाई करत नाही तोपर्यंत मी आंदोलन मागे घेणार नाही. विमा कंपनीवर त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मयूर बोर्डे यांनी तहसीलदार यांना सांगितले .त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यांच्या भेटीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हा सचिव मुरलीधर डहाके व जिल्हा संघटक अनिस पठाण ठेकेदार हे सुद्धा भेट देऊन गेले त्यांनी सुध्दा मयूर बोर्डे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या या अन्नत्याग आंदोलनाला साथ देण्यासाठी शेतकरी संघटनेचे बरेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here