Home जालना जालना झाले “बिहार”खुनाची मालिका सुरूच. जालना शहरात दिवसा खुन, दरोडे, चोऱ्या, घरफोड्या,...

जालना झाले “बिहार”खुनाची मालिका सुरूच. जालना शहरात दिवसा खुन, दरोडे, चोऱ्या, घरफोड्या, व्यापारी, शेतकरी यांची लुट यावरून जालणन्याचे बिहारच झाल्याचे नागरिकांची भावना

39
0

आशाताई बच्छाव

1000559287.jpg

जालना झाले “बिहार”खुनाची मालिका सुरूच.
जालना शहरात दिवसा खुन, दरोडे, चोऱ्या, घरफोड्या, व्यापारी, शेतकरी यांची लुट यावरून जालणन्याचे बिहारच झाल्याचे नागरिकांची भावना
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक १८/०७/२०२४
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहर मागील पंधरा दिवसात अनेक हत्या व खुनाच्या घटनांमुळे हादरले आहे. ही खुनाची मालिकाच ठरली आहे. त्यामुळे जालना शहरातील वातावरण भयभीत झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. शहरात अनेक गुंड सर्वसामान्य लोकांना त्रास देत असून धमक्या देतात व दिवसा चोऱ्या, घरफोड्या व्यापाऱ्यांची लूट करणे, खुन करणे, गरीब व सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करून त्यांना धमकावने अशा अनेक घटना शहरात घडत असून याकडे पोलीस पोलीस प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे . गुन्हेगारांना पोलिसांची भीती शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे गुन्ह्याची मालिका ही सतत सुरू असून ती कमी होण्याचे नाव घेत नाही. वाहनांच्या बाबतीत असेच काही पहावयास मिळते. बुलेट सारख्या टू व्हीलर गाडीमुळे कमालीचे ध्वनी प्रदूषण वाढले असून गाडी ची रेसिंग वाढविणे व हॉर्न वाजवून सर्वसामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे प्रकारही शहरात रोज वाढत आहेत. याकडेही पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर करडी नजर ठेवून शासन केल्याशिवाय गुन्हेगारी कमी होणार नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे .परंतु पोलीस” चोर सोडून संन्याशाला फाशी देतात हे विशेष.ही एक शोकांतिकाच असल्याचे शहरातील नागरिक बोलत आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारावर करडी नजर ठेवून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Previous articleचाळीसगाव मधील सकल हिंदू समाजाच्या निवेदनानंतर बबडी शेखवर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Next articleजानेफळ पंडित येथे मयूर बोर्डे यांचे विमा कंपनीच्या अन्याया विरोधात अन्नत्याग उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here