Home भंडारा पवनी ते शिवनाळा बस सुरू करा – आगार व्यवस्थापक पवनी यांना निवेदन...

पवनी ते शिवनाळा बस सुरू करा – आगार व्यवस्थापक पवनी यांना निवेदन सादर

304
0

आशाताई बच्छाव

1000559252.jpg

पवनी ते शिवनाळा बस सुरू करा –
आगार व्यवस्थापक पवनी यांना निवेदन सादर

गरीब ,होतकरू मुलांना शाळेपासून राहावे लागत आहे वंचित

विद्यार्थ्यांची शैक्षणिक भरपाई कोण करणार?

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील पवनी ते जुनोना ही बस सेवा अचानक बंद झाल्यामुळे जुनोना, शिवनाला ,वलनी ,मांगली येथील मुले पवनी येथे शिक्षण घेण्याकरता येत असतात. परंतु शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले परंतु शिवनाळा ते पवनी बस बंद झाल्यामुळे मुले शाळेत पोहोचू शकत नाही .परिणामी या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थी व पालक रोटी सोडून ज्यांच्याकडे दुचाकी वाहने आहेत ते पालक आपल्या पाल्याला पवनी येथील शाळेत नेऊन देतात. ही सर्व गावे पवनी पासून९ ते १२ किलोमीटर अंतरावर आहेत .बस शिवाय गोरगरिबांची मुले शाळेत जाऊ जाऊ शकत नाही .त्यामुळे बस तात्काळ सुरू करण्यात यावी. याबाबत सरपंच सुभाष खंडाळे यांनी आगारात जाऊन पवनी येथील बस व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले. परंतु अद्याप कोणतेही कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. बस सेवा पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे .विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना परिवहन महामंडळ किंवा जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे ? ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी असे मागणी सरपंच सुभाष खंडाळे, उपसरपंच द्रोणाचार्य बावनकर,ग्रामपंचायत सदस्य मंगेश कोसेकर ,संदीप बावनकर, युवराज बावनकर युवराज सावरबांधे ,गावकरी, पालकांनी ,विद्यार्थ्यांनी केलेली आहे.

Previous articleलोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी सोमय्या महाविद्यालयात साजरी
Next articleपेणच्या गणपतींना भौगोलिक मानांकन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here