Home बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे उद्या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन , जिल्हयातील बांधकाम कामगारांच्या न्यायहक्कासाठी...

जिल्हा काँग्रेसचे उद्या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन , जिल्हयातील बांधकाम कामगारांच्या न्यायहक्कासाठी सहभागी व्हावे – जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे….

25
0

आशाताई बच्छाव

1000559199.jpg

जिल्हा काँग्रेसचे उद्या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन , जिल्हयातील बांधकाम कामगारांच्या न्यायहक्कासाठी सहभागी व्हावे – जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे….
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा जिल्हयातील बांधकाम कामगारांना विविध समस्यांना तोंड दयावे लागत असुन जिल्हयातील कामगारांना गृह उपयोगी संच व इतर आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात येत असतांना काही मतदार संघात साहित्य वाटप रखडल्याने बांधकाम कामगारांना वंचित राहण्याची पाळी येवून ठेपली आहे. एखादा अपघात घडल्यास नोंदणी अभावी कामगार मुत्यूमुखी पडल्यास ग्रामसेवक, मुख्याधिकारी की, कामगार अधिकारी यापैकी कोणास जबाबदार धरणार? नविन बांधकाम कामगारांची तात्काळ नोंदणी करण्यात यावी, बांधकाम कामगारांच्या दैनंदीन जिवनात त्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्याकरीता दिनांक 18 जुलै 2024 रोज गुरूवारला सकाळी 11 वाजता जिल्हा कामगार कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील कामगार तसेच काँग्रेसच्याा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
जिल्हयातील बहुतांशी बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळात केली असुन त्यांना मंडळामार्फत शासनाच्या विविध योजना लागु करण्यात येतात. मात्र अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन व भविष्यासाठी त्यांच्याकडे रोजमजुरी शिवाय पर्याय नाही, तसेच कामगारांच्या कुटूंबातील अनेक हुशार मुला-मुलींकडे अधुनिक साहित्य देखील नाही. बांधकाम कामगारांच्या समस्या दिवसागणीक वाढतच आहेत. या कामगारांसाठी विमा संरक्षण देण्यात आले होते, मात्र सन 2015 पासुन नंतर यासाठी आवश्यक ती पुर्तता न झाल्याने नव्याने नोंदणी झालेले कामगार विमा संरक्षणापासुन वंचित आहेत. कामगार कल्याण मंडळाकडुन कामगारांसाठी गृह उपयोगी संच उपलब्ध करून देण्यात आलेले असतांना केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी काही विधानसभा मतदार संघातील कामगारांचे साहित्य संच वाटप रखडले आहे.
ग्रामसेवकांच्या प्रमाणपत्रा अभावी ग्रामीण भागात नोंदणी रखडली आहे, ती तात्काळ करण्याची व्यवस्था करावी, ग्रामपातळीवर कामगारांचे आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्ययात यावे, ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कामगारांची ससेहोलपट थांबवावी, या व इतर अनेक समस्यांनी बांधकाम कामगार बांधवांना ग्रासले आहे. या समस्यांच्या विळख्यातुन कामगार बांधवांच्या सुटकेसाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येत्या गुरुवारी जिल्हा कामगार कार्यालयावर धडक देवुन तिव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. याप्रसंगी जिल्हाभरातील कामगार तसेच काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here