Home बुलढाणा एसटीमध्ये अर्धा तिकीट करण्यासाठी वय वाढवले,आता आधार सेंटरवर जाऊनही वय कमी होईना….

एसटीमध्ये अर्धा तिकीट करण्यासाठी वय वाढवले,आता आधार सेंटरवर जाऊनही वय कमी होईना….

16
0

आशाताई बच्छाव

1000559194.jpg

एसटीमध्ये अर्धा तिकीट करण्यासाठी वय वाढवले,आता आधार सेंटरवर जाऊनही वय कमी होईना….
युवा मराठा न्यू संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- एसटी बसच्या प्रवासभाड्यात सवलत मिळावी, यासाठी अनेक महिलांनी आधार कार्डवर वय वाढवले आहे. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना आणली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्डमध्ये सुधारणा करण्यासाठी सेतू केंद्रावर गर्दी होताना दिसून येत आहे. एसटीच्या मोफत प्रवासासाठी काही महिलांनी आधार कार्डवर ७५ वर्षे वय करून घेतलेले आहे.आता मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी वय कमी करण्याचा खटाटोप करावा लागत असल्याने लाडक्या बहीण योजनेमुळे काही महिलांची चांगलीच अडचण केली आहे. आपल्यालाही या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी अनेक महिला सेतू केंद्रावर गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.

महिलांसह पुरुषांकडेही विविध वयांचे आधार कार्ड एसटीच्या वाहकांना आढळून येतात.अनेकदा यावरून वाहक व ज्येष्ठांमध्ये वादही होतात.आता तेच ज्येष्ठ लाडकी बहीण योजनेसाठी वय कमी करून घेत आहेत. या योजनेत २१ ते ६७ वर्षे वयाची अट आहे. अनेक महिलांनी वय कमी असतानाही ७५ वर्षे वय करून घेतले आहे.आता त्या आपले खरे वय असलेले आधार कार्ड बनवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र आधार केंद्र चालकांनी महिलांना जन्माचा पुरावा असल्याशिवाय आधारवरील वय कमी होत नाही अशी माहिती दिल्यानंतर महिला अडचणीत आल्या आहे.कारण जन्माच्या प्रमाणपत्राची काही महिलांची नोंदच मिळत नसल्यामुळे महिलांना लाडकी बहीण होण्यापासून मुकाव लागत की काय असं महिलांना वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here