आशाताई बच्छाव
चामोर्शी येथे मुल-आष्टी चौकात मा.सा कन्नमवार यांचा पुतळा उभारा
महिला बेलदार समाज संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदन
३० जानेवारीपर्यंत पुतळा उभारणार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे महिला बेलदार समाज संघटनेला आश्वासन
चामोर्शी/ गडचिरोली,( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.सा कन्नमवार यांचा चामोर्शी नगरपंचायत क्षेत्रातील मुल-आष्टी या चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी महिला बेलदार समाज संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली
याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मा.सा कन्नमवार यांचा पूर्णाकृती पुतळा ३० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकाना दिले.
यावेळी संघटनेच्या अध्यक्षा रजनीताई तन्नेरवार ,सचिव वैशालीताई कोमलवार, उषाध्यक्ष माधवीताई पेशट्टीवार, सदस्य विनाताई प्रीसिंगलवार , सोनी दाडमवार , हरबा प्रीसिंगलवार, साईनाथ पेशट्टीवार यांचे सह समाज भगिनी व बांधव उपस्थित होते.