आशाताई बच्छाव
कोसगाव येथे घाणीचेसाम्राज्य ग्रामपंचायतचे दुर्लक्ष…. . माहोरा जालना प्रतिनिधी …. मुरलीधर डहाके…18/07/2024.. सविस्तर वृत्त असे की भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथील गल्ली गल्ली मध्ये तसेच जुन्या ग्रामपंचायतच्या समोरच कचऱ्याचे मोठमोठी धीग लागले आहेत. गावात मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला आहे मात्र या घाणीकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसून या घाणीकडे ग्रामपंचायत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत. गावातील ग्रामस्थांचा कायमस्वरूपी वापरण्याचा मुख्य रस्ता आहे. त्या रस्त्यावर कमालीची घाण झालेली असून मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेसी चा मुख्य प्रवेशद्वार येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा या घाणीचा सामना करावा लागत आहे. परंतु स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाला मात्र त्यांचे काहीच देणे घेणे नाही. अनेक गावकरी पूजा आरती साठी गावाबाहेर असलेल्या मंदिरात जातात त्यांना सुद्धा या घाणीचा सामना करावा लागतो. परंतु कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. गावात ग्रामपंचायत समोरच गावच्या परिसरात खूपमोठ्या प्रमाणात घाण साचलेली असून त्या घाणीमुळे आजार पसरू लागला आहे व त्यामुळे ग्रामस्थ धोक्यात आलेली आहे. गाव वीज पुरवठा करणारी डीपी त्या ठिकाणी आहे. गावातील विद्युत नागरिकांना डीपीवर जावे लागते त्या ठिकाणी सुद्धा कचऱ्याचे खूप मोठ मोठे एखाद्या वेळेस दुर्दैवाने डीपीवर शॉर्टसर्किट आग लागून फार मोठा अनर्थ या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशी गावकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे मात्र या गोष्टीकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गावातील गल्लीबोळीत ठिकठिकाणी जमा असलेला कचरा व घाण साफ करावी जेणेकरून गावात येणाऱ्या साथीच्या आजाराला आळा घातला जाईल या ठिकाणाहून सर्वाचाच वापर असतो परंतु गावातील सरपंच उपसरपंच सदस्य एकूणच ग्रामपंचायत प्रशासन डोळे बंद करून बसले आहेत काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.