Home ठाणे पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

34
0

आशाताई बच्छाव

1000552193.jpg

पावसाचे पाणी साचलेल्या खड्ड्यात पोहायला गेले ते परतलेच नाही; भिवंडीत खळबळ

युवा मराठा न्यूज ठाणे ब्युरो चीफ / भिवंडी :- फय्याज मोमीन

माती खणलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाल्याने या पाणी साचलेल्या डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी भिवंडी शहरातील पोगाव डोंगरपाडा परिसरात घडली आहे. अली अन्वर शेख (वय 17 वर्ष) व सानीब रईस अन्सारी (वय 16 वर्ष) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे आहेत. कशी घडली घटना ? गेल्या दोनचार दिवसांत ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला होता. परिणामी नदी नाल्यांना पूर आला आहे. भिवंडी येथील मातीसाठी खणलेल्या खड्डयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. अली व सानीब हे दोघेही शांतीनगर परिसरात राहणारे होते. पोगाव डोंगरपाडा येथे खड्डयांमध्ये जमा झालेल्या पाण्यामध्ये अंघोळीसाठी मित्रां सोबत गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. ही घटना इतर मित्रांनी शेजारील नागरिकांना सांगितल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत मुलांचा मृत्यू झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

वाचा – तरुणाने माकडाच्या पिल्लासोबत जे केलं ते होतं भयंकर, तुमचीही तळपायाची आग मस्तका.. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहेत. या घटनेप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर युवक राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. या ठिकाणी मागील चार वर्षात अशा पाण्यात बुडून मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. प्रशासन आणखी किती मुलांचा जीव घेणार? असा संतप्त सवाल येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Previous articleजिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू होणार_ _भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या प्रयत्नाला यश_.
Next articleभिवंडीत उघड्या वाहनातून कचऱ्याची वाहतूक; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here