
आशाताई बच्छाव
भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात आढळल्या तब्बल २१ अनधिकृत शाळा
युवा मराठा न्यूज ठाणे ब्युरो चीफ / भिवंडी :- फय्याज मोमीन
भिवंडी- निजामपूर शहर महापालिका कार्यक्षेत्रात सरकारची परवानगी नसताना अनेक ठिकाणी अनधिकृत शाळा सुरू आहेत.
पालकांनी या शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेऊ नये; तसेच ज्यांची मुले या सरकार मान्यता नसलेल्या शाळेमध्ये शिकत आहेत, त्यांनी सरकारमान्य शाळेत पाल्याचे प्रवेश करावेत, असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.
पालिका क्षेत्रातील शाळा व्यवस्थापनाने परवानगी नसलेल्या शाळा त्वरित बंद कराव्यात, अन्यथा त्यांच्यावर बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत दंडात्मक आणि कायदेशीर, प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशाराही वैद्य यांनी दिला आहे.
पालिका क्षेत्रातील अनेक शाळांना पालिकेने कोणतीही अधिकृत परवानगी दिलेली नाही. त्यामुळे तेथे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. जर कोणी प्रवेश घेतला असेल, तर तो रद्द करावा. तसेच, अधिकृत मान्यताप्राप्त शाळेत प्रवेश घ्यावा. आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये, याची सर्व खबरदारी पालकांनी घ्यावी, असे आवाहन आयुक्त वैद्य यांनी केले आहे.
पालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळा
१. झम झम मकतब शाळा, रावजीनगर, नवी वस्ती कल्याण रोड, भिवंडी
२. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंग्रजी शाळा, रावजीनगर, नवी वस्ती कल्याण रोड, भिवंडी
३. रॉयल इंग्रजी शाळा, गुलाम नबी पटेल कम्पाऊंड, धामणकर नाका, भिवंडी
४. नोबेल इंग्रजी शाळा, अवचित पाडा, खान कम्पाऊंड, गैबीनगर, भिवंडी
५. अल रजा उर्दू प्राथमिक शाळा, राजधानी रोड, खान कम्पाऊंड, गैबीनगर, भिवंडी
६. मराठी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पाईपलाईनशेजारी, टेमघर, भिवंडी
७. इंग्लिश प्राथमिक शाळा, टेमघर पाडा, भादवड
८. दि लर्निंग प्राथमिक शाळा, टेमघर पाडा, भादवड
९. एकता इंग्रजी पब्लिक शाळा, शंभर फूट रोड, नागाव गायत्रीनगर, भिवंडी
१०. एकता उर्दू पब्लिक शाळा, शंभर फूट रोड, नागांव गायत्रीनगर, भिवडी
११. ए.आर. रेहमान उर्दू प्राथमिक शाळा, फातमानगर, नागाव
१२. झवेरीया उर्दू प्राथमिक शाळा, अपना हॉस्पिटलमागे, गैबीनगर, भिवंडी
१३. विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा, नदीवस्ती, कल्याण रोड
१४. सरस्वती इंग्रजी शाळा, नवी वस्ती, गौतम कम्पाऊंड, कल्याण रोड, भिवंडी
१५. अल हिदाया पब्लिक प्राथमिक शाळा, हुदया मस्जिद पटेलनगर, भिवंडी
१६. तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा, निशाद हॉटेल, चिहीशाह दर्गाजवळ, भिवंडी
१७. इकरा इस्लामिक शाळा आणि मकतब, ताहेरा टॉवर शेजारी, नदी नाका, भिवंडी
१८. कॅन्सर बेगम इंग्रजी शाळा, सागर प्लाझा हॉटेलसमोर, नागाव, भिवंडी
१९. अल फलक मकतब आणि इंग्रजी प्राथमिक शाळा, साहिल हॉटेलजवळ
२०. फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा, दर्गाह रोड, भिवंडी दिवानशाह दर्गा रोड, भिवंडी
२१. गितांजली इंग्रजी माध्यमिक शाळा, पहमानगर, वहाळ देवी रोड, भिवंडी