Home रायगड राज्य अंजिक्यपद कबडी स्पर्धेसाठी रायगड जिल्हाचा पुरुष संघ जाहीर

राज्य अंजिक्यपद कबडी स्पर्धेसाठी रायगड जिल्हाचा पुरुष संघ जाहीर

65
0

आशाताई बच्छाव

1000540616.jpg

राज्य अंजिक्यपद कबडी स्पर्धेसाठी रायगड जिल्हाचा पुरुष संघ जाहीर

युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन

15 ते 17जुलै दरम्यान पुणे बालेवाडी येथे होणार्‍या 71 व्या महाराष्ट्र् राज्य अंजिक्यपद, निवड चाचणी कबडी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबडी असोसिएशनने पुरूष गटाचा कबडी संघ जाहीर केला असुन या संघाचा सराव शिबिर पांडवादेवी येथील जय मंगळ सभागुहात घेण्यात आले या सराव शिबिराचे सांगता समारंभ प्रसंगी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे. पाटील, हिराचंद पाटील प्रथमेश पाटील, जनार्दन पाटील, फिटनेस ट्रेनर संतोष शिर्के,राष्ट्रीय खेळांडु ऋणाली मोकल, अशिष पाटील, सुधिर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा असोसिएशनने उत्तम प्रकारे सराव शिबिर आयोजित केले होते रायगड जिल्ह्याच्या पुरुष गटाच्या कबड्डी संघाने राज्य अंजिक्यपद कबड्डी स्पर्धेत चागली कामगिरी करावी असे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे. जे. पाटील यांनी या वेळी खेळांडुना मार्गदर्शन करताना सांगितले.

खेळांडुनी सराव शिबिरात कसुन सराव केला असुन रायगडचा संघ राज्य अजिक्यपद कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी करेल असे संघाचे प्रशिक्षक प्रथमेश पाटील, व्यवस्थापक हिराचंद पाटील यांनी सांगितले.
राज्य अंजिक्यपद स्पर्धेत सांघिक खेळ करुन या स्पर्धेत विजय संपादन करु असे खेळांडुनी सांगितले.

रायगड जिल्हा पुरुष कबड्डी संघ

ऋत्विक पाटील – कर्णधार,
प्रशांत जाधव – उपकर्णधार,
मयूर कदम ,निलेश थळे , दिपक कासारे, प्रतिक बैलमारे, अनुराग सिंग,राकेश गायकवाड, सुमित पाटील, प्रणव ईदूलकर,वैभव मोरे, निखिल शिर्के,संघव्यवस्थापक हिराचंद पाटील,संघ प्रशिक्षक
प्रथमेश पाटील

रायगड जिल्हयाच्या कबडी संघात निवड झालेल्या खेळांडुचे  रायगड जिल्हा कबडी असोसिएशनच्या पदाधिका-यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

____
फोटोओळः राज्य अंजिक्यपद कबडी स्पर्धेसाठी निवडलेला रायगड जिल्हाचा पुरुष संघ

Previous articleभिवंडीतील लिओ किड्स शाळेत शिक्षण हक्क कायद्याचा खून
Next articleछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील पायरी मार्गावर पुन्हा दरड कोसळली!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here