Home ठाणे भिवंडीतील लिओ किड्स शाळेत शिक्षण हक्क कायद्याचा खून

भिवंडीतील लिओ किड्स शाळेत शिक्षण हक्क कायद्याचा खून

54
0

आशाताई बच्छाव

1000540605.jpg

भिवंडीतील लिओ किड्स शाळेत शिक्षण हक्क कायद्याचा खून

अर्चना गायकवाड या विद्यार्थिनीला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुजोर व्यवस्थापक विकास जैनवर गुन्हा दाखल करा – बहुजन विद्यार्थी संघटनेची मागणी

 

युवा मराठा न्यूज ठाणे ब्युरो चीफ / भिवंडी :- फय्याज मोमीन

भिवंडी महापालिका क्षेत्रातील लिओ किड्स ही खाजगी व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची शाळा RTE अर्थात शिक्षण हक्क कायद्याने प्रवेश घेतलेल्या कु.अर्चना योगेश गायकवाड इयत्ता तिसरी हिच्या पालकांकडे वर्षाची 18 हजार रुपये फी मागत आहे. ह्या विद्यार्थिनीचे पालक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून त्यांच्याकडे 18 हजार रुपये शाळेत भरायला नसल्याने त्यांनी आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून काढून महानगरपालिकेच्या मराठी शाळेत टाकली असून तिचा शाळेचा दाखला नियोकीड शाळेमध्ये मागायला गेले असताना पालकांकडे दहा हजार रुपयाची मागणी शाळेचा व्यवस्थापक श्री विकास जैन याने केली. पालकांनी याची तक्रार बहुजन विद्यार्थी संघटना कडे केली असता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज विकास जैन यांचे भेट घेऊन त्यांना जाब विचारला असता तुम्हाला जे काही करायची ते करा. माझ्या शाळेचा नियम आहे मी अठरा हजार रुपये प्रत्येक आरटीओ विद्यार्थ्यांकडून घेतो. मला शासन पैसे देत नाही. त्यामुळे तुम्ही पैसे दिले नाहीत तर मी शाळेचा दाखला देणार नाही अशा मुजोर भाषेत शाळेच्या अध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांशी वाद घातला.
भिवंडी महापालिकेचे प्रशासन अधिकारी श्री उपेंद्र सांबारी यांची भेट बहुजन विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने घेऊन मुजोर किशोर जैन यांच्या शाळेवर कारवाई करण्यात यावी. शिक्षण हक्क कायद्याची होत असलेली पायमल्ली, शिक्षण हक्क कायद्याचा होत असलेला खून थांबविण्यात यावा. वंचित घटकातील व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मिळालेला अधिकार आबादीत रहावा. आरती विद्यार्थ्यांना RTE अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना विना सायास शिक्षण घेता यावे. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची जादाचे शुल्क घेऊ नये. कु. अर्चना योगेश गायकवाड हिला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या विकास जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने भिवंडी महापालिकेच्या प्रशासनाधिकाऱ्याकडे केली आहे.
भिवंडी महापालिका शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने लिओ किड्स शाळेचा अध्यक्ष व्यवस्थापक विकास जैन याने आज एका रिक्षा चालकाच्या मुलीचा शिक्षणाचा अधिकार हिरावून घेतला आहे. तिला शिक्षणापासून वंचित ठेवली आहे. खऱ्या अर्थाने शिक्षण हक्क कायद्याचा खून विकास जैन आणि भिवंडी महापालिकेच्या शिक्षण मंडळाने केला आहे

Previous articleमुर्ती गावातील अकरा आरोपींचा एट्रोसिटी ऍक्ट केस मध्ये अटकपूर्व जामीन अर्ज रद्द
Next articleराज्य अंजिक्यपद कबडी स्पर्धेसाठी रायगड जिल्हाचा पुरुष संघ जाहीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here