Home नांदेड मुखेड येथे रविवारी दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.

मुखेड येथे रविवारी दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.

69
0

आशाताई बच्छाव

1000537979.jpg

मुखेड येथे रविवारी दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा.

गुणवंत विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे आयोजकांचे आवाहन.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कै.आर.के.पाटील चोंडीकर यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते विवेक पाटील चोंडीकर मित्र मंडळाच्या वतीने रविवारी दि.१४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कै.गोविंदराव राठोड क्रिडा संकुल बिएसएनएल आॅफीस जवळ मुखेड येथे सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी गुणगौरव सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते सन्मान स्वीकारावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.
सोहळा कौतुकांचा, क्षण आंनदाचा,गुणगौरव सन्मान सोहळा दहावी,बारावीच्या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मुबंईचे शिधावाटप नियत्रंक व संचालक नागरी पुरवठा सुधाकरराव तेलंग यांची उपस्थित लाभणार आहे., कार्यक्रमाचे उदघाटन नांदेड पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, लातुर पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांच्या हस्ते होणार आहे.,प्रमुख अतिथी म्हणून ठाण्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप जाधव, नांदेड वाघाळा मनपा आयुक्त महेश डोईफोडे, मराठा सेवासंघ राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, देगलुरचे उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, शिधावाटप अंमलबजावणी उपनियत्रंक मधुकर बोडके, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, से.नि.पाणीपुरवठा अधिक्षक अभियंता मधुजी गिरगांवकर, माध्य व उच्च माध्यमिक विभागीय सचिव सुधाकर तेलंग, से.नि.प्रादेशिक सहसंचालक उत्तम सोनकांबळे, सेवानिवृत जिएसटी उपायुकत्त नजीरसाब शेख, सेवानिवृत्त सहआयुक्त आबाजी वडजे, सेवानिवृत्त समाजकल्याण अतिरिक्त आयुक्त सदानंद पाटील, सेवानिवृत्त जिल्हा अधिक्षक,कृषीधिकारी राजेश्वर पाटील, सेवानिवृत्त वन अधिकारी डी.एस.पवार, जिएसटी सहाय्यक आयुक्त प्रकाश गोपनर, सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी विश्वनाथ कोंडेकर, सेवानिवृत्त उपमुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी, मुख्याधिकारी आशितोष चिंचाळकर, तहसिलदार राजेश जाधव, तहसीलदार राजाभाऊ कदम, माध्यमिक शिक्षणधिकारी माधव सलगर, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, प्राथमिक शिक्षणधिकारी सौ.सविता बिरगे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, गटविकास अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा उद्याग केंद्र महाव्यवस्थापक अमोल इंगळे, पोलीस निरिक्षक विश्वनाथ झुजांरे, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक अनिल कदम, जलसंपदा विभागाचे उपाभियंता प्रताप पाटील झरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश वडजे, पोलीस निरीक्षक नागेश भोसले, शिक्षण अधिकारी योगेश पाटील आडलुरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रिकांत ठिकाणे, कर सल्लागार सुभाष इंगळे, बालकल्याण समिती सदस्य डाॅ.सौ.सत्यभामा जाधव, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस निरिक्षक एन.जे.शेख,भार्गव कोचिंग क्लासेसचे संचालक भार्गव राजे, कल्याणकर कोंचिग क्लासेसचे संचालक डाॅ.नागेश कल्याणकर, आयआयबी इन्स्टिट्यूटचे संचालक दशरथराव पाटील, जाधव कोंचिग क्लासेसचे संचालक आर.बी.जाधव सह विविध विभागातील अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातिल मान्यवरांची गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तरी मुखेड-कंधार विधानसभेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारावा असे आवाहन आयोजक विवेक पाटील चोंडीकर मित्रमंडळच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleएक रुपयात पीक विमा योजना काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी
Next articleमुर्ती गावातील अकरा आरोपींचा एट्रोसिटी ऍक्ट केस मध्ये अटकपूर्व जामीन अर्ज रद्द
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here