Home वाशिम पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाचे आंदोलन मुख्यमंत्र्यांना दिले मागण्यांचे निवेदन

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाचे आंदोलन मुख्यमंत्र्यांना दिले मागण्यांचे निवेदन

47
0

आशाताई बच्छाव

1000522285.jpg

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मिडीयाचे आंदोलन
मुख्यमंत्र्यांना दिले मागण्यांचे निवेदन
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)– साप्ताहिक वृत्तपत्रांसह दैनिके, न्युज चॅनल व इतर प्रसारमाध्यमांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी देशात क्रमांक एक वर असलेल्या व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने ४ जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनात व साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष गजानन धामणे व प्रदेश उपाध्यक्ष संदीप पिंपळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, राज्यभरातील दैनिके, साप्ताहिके, न्युज चॅनल, न्युज पोर्टल, युट्युब पोर्टल आदींच्य विविध मागण्यांसंदर्भात व्हाईस ऑफ मिडीयाच्या वतीने संपुर्ण राज्यात एकाच वेळी राज्यस्तरीय आंदोलनांतर्गत धरणे आंदोलने राबविण्यात आले. त्यानुसार पत्रकारांच्या मागण्या आज रोजी शासनदरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र शासनाकडून पत्रकारांवर अन्याय केला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पत्रकारांच्या मागण्यांमध्ये, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे.साप्ताहिक वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करावी. साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी. अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी. रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी. पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी. आरएनआय कडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. दैनिकांप्रमाणे साप्ताहिकांना विशेष प्रसिध्दीच्या जाहिराती देण्यात याव्या. सर्व दर्शनी जाहिरातीचा आकार ८०० चौसेमी. करण्यात यावा. अधिस्विकृतीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या. कोरोनापासून बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासातील सवलत पुर्ववत सुरु करण्यात यावी. न्युजप्रिंट वरील जीएसटीची अट रद्द करण्यात यावी. सर्व साप्ताहिकांना शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतीच्या जाहिराती देण्यात याव्या, आदी मागण्या नमूद करण्यात आल्या आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी निवेदन स्विकारले. निवेदन देतांना व्हॉईस ऑफ मिडीयाचे विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख, विदर्भ संघटक नंदकिशोर वैद्य, जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल पाटील, जिल्हा सचिव धनंजय कपाले, जिल्हा संघटक दत्ता महाले, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, इलेक्ट्रॉनिक विंगचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोहळे, अतिश देशमुख, मंकेश माळी, जिल्हा सचिव रमेश उंडाळ, साजन धाबे, किरण पडघान, मालेगाव तालुकाध्यक्ष अजय चोथमल, मानोरा तालुकाध्यक्ष वसंत राठोड, सचिव योगेश देशमुख, उपाध्यक्ष अनिल राठोड, संघटक निखिल वानखडे, कार्याध्यक्ष राजु ठाकरे, कोषाध्यक्ष हरिष खडकीकर, बाबाराव कोडापे, बालाजी ठेंगडे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

Previous articleनंदीपेठ भागातील उखडलेल्या रस्त्यामुळे वृध्द महिला व पुरुषांना गंभीर इजा
Next articleनाशिक जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमधील मुलींना मिळणार मोफत सायकल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here